February 21, 2007

लाडवांचा निकाल..

मनोगतावर मी एकदा मनोगतींच्या आवडत्या लाडवांवरून त्यांचा स्वभाव ओळखण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा हा वृत्तांत! ;)

राम राम मंडळी,

आपण बहुसंख्येने लाडवांच्या खेळात सहभागी झाल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार. खरंच मंडळी, एवढा प्रतिसाद मिळेल असं मलाही वाटलं नव्हतं. मला आलेले काही काही व्य नि देखील खूप मजेदार होते. आमचे नामी विलास महाराज म्हणाले, "तात्या, बरा कामाला लावतोस एकेकाला!" कुणी लिहिलं, "तात्या मला अमुक लाडू आवडतो, पण जरा प्रेमाने हां!" जसं काही मी त्याला कुठलीतरी शिक्षाच करणार होतो!! एकानं लिहिलं, "तात्या, हे लाडवांवरून स्वभाव ओळखण्याचं खरं आहे का हो?:)" एकीने लिहिलं, "तात्या, रव्याच्या लाडू खवा घालून आणि न घालतासुद्धा करतात. खवा घातला तर स्वभाव बदलतो का हो?"!! :D एकीने लिहिलं, "तात्या, तुमचा आवडता लाडू कुठला? तोच माझा! ओहोहो, आपण साला खल्लास!!" :)

काही मंडळींनी तर लाडवांच्या नादात थेट मला 'मनोगताचं लाडकं व्यक्तिमत्त्व' ही पदवीदेखील बहाल केली! (गुरुवर्य भाईकाका, लाडू खा आणि यांना क्षमा करा!!!)

असो. मी आधीच म्हटलं होतं की हा एक खेळ आहे. जरा थोडी गंमत. मंडळी, मूळचा कुठलाच माणूस वाईट नसतो, आणि लाडू आवडणारी माणसं तर नक्कीच वाईट नसतात. चांगलीच असतात. मग तो लाडू कुठलाही असो! मी तर म्हणेन की प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो म्हणून तर जगण्यात मजा असते. सगळेच सारखे असते तर काय गंमत राहिली?
तर आता आपण निकालांकडे वळूया.

अ) रव्याचा लाडू आवडणारे मनोगती -

नंदन, स्वल्पविराम, सूर्य, महेश हतेळकर, अनिरुद्ध पटवर्धन, एकलव्य, सवाई, गौरी सुनील, प्राजक्ती, अनुप्रिता, कपिल९४२२०४५२४८, आसावरी.

मंडळी, रव्याचा लाडू दिसतो कसा पहा! साधा, पांढरा शुभ्र आणि सात्त्विक!! हा लाडू आवडणारी माणसंदेखील तशीच असतात. ही माझी अत्यंत आवडती माणसं! लोकं यांच्यावर मनापासून प्रेम करतात. ही माणसं अत्यंत साधी असतात. आपण बरं की आपलं काम बरं, अश्या स्वभावाची असतात. कुणाच्या अध्यात नाहीत की कुणाच्या मध्यात! आयुष्याकडून यांच्या फार अपेक्षा नसतात. हाती घेतलेलं प्रत्येक काम प्रामाणिकपणे करणं आणि बाजूला होणं एवढंच यांना माहीत! ही माणसं वृत्तीने अत्यंत घरगुती आणि कुटुंबवत्सल असतात. कुटुंबात रमणारी असतात. यांचे पाय नेहमी जमीनीवर घट्ट रोवलेले असतात. उगाचच्या उगाच भलत्या उड्या आणि मोठमोठ्या गप्पा ही माणसं मारत नाहीत! एकंदरीतच कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाणं यांना जमत नाही. वृत्तीने मात्र अत्यंत सेवाभावी, कामसू आणि कष्टाळू वृत्तीची असतात. स्वभावाने तशी गरीब असतात. एक गोष्ट मात्र खरी, ही माणसं अत्यंत विश्वासू असतात, मैत्रीला लाख असतात. यांच्यावर जरूर विसंबून रहावं, कधी निराशा पदरी येणार नाही! पहा मंडळी, काय गंमत आहे! इतर दोन लाडवांच्या तुलनेत ही मंडळी कमी आहेत. आपल्याला तरी प्रत्यक्ष जीवनात अशी मंडळी हल्ली कुठे फारशी पहायला मिळतात? आहे की नाही माझं अनॅलिसिस बरोब्बर? :)

ब) बेसनाचा लाडू आवडणारे मनोगती -

आदित्य पानसे, चक्रपाणी, संध्या पिसाळ, मेघदूत, परि आणि बदक, देवदत्त, अ-मोल, शशांक उपाध्ये, राधिका, तो, नामी विलास, नारद, अनु, साधना, रोहिणी, विनायक, मैत्री, शशांक, माधवी गाडगीळ, छावा, खादाड बोका.

काय मंडळी, नुसती नांवं वाचूनच कल्पना आली की नाही?!:) ही माणसं मात्र रव्याच्या लाडवाप्रमाणे साधी, गरीब वगैरे नाहीत बरं का! लई डेंजर जमात आहे ही. ही माणसं एकदम तल्लख बुद्धीची, आणि चाणाक्ष असतात. किंचित माथेफिरू जात आहे ही. यांच्या वाटेला कुणी जाऊ नये. यांच्या आवडीनिवडी अगदी ठराविक आणि टिपीकल असतात. अत्तर आहे म्हणून लावलं आपलं कुठलंही अत्तर, असं यांचं नाही. यांच्या आवडीचं असेल तरच लावतील. यांचं राहणीमानदेखील एकदम टिपीकल असतं. एकंदरीतच बावळटपणा यांना सहन होत नाही. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सगळं यांना लागतं!स्वभावाने अत्यंत तऱ्हेवाईक माणसं असतात ही. यांच्या मनासारखं नाही झालं तर आरडाओरडा आणि आदळाआपट करतात. एक मात्र खरं, यांची जर एखाद्यावर मर्जी झाली तर त्याच्यासाठी मात्र काय वाट्टेल ते करतील. कुठल्याही गोष्टीचा सखोल आणि दांडगा अभ्यास असतो यांचा. एखाद्या गोष्टीतली नेमकी मेख यांना पटकन कळते. १० माणसांना डोकं खाजवून जर एखाद्या गोष्टीचं उत्तर माहीत नसेल तर यांच्याकडे जावं. क्षणांत उत्तर मिळेल! पण वरती "हे काय, एवढंही माहीत नाही?" असं ऐकूनही घ्यावं लागेल :) एक मात्र नक्की, की चार युक्तीच्या गोष्टी जर हव्या असतील तर यांच्याकडे अगदी हमखास जावं! बेसनाच्या लाडवांचंपण असंच आहे! हा लाडू दिसतो कसा पहा! खमंग रंगाचा! चवीलाही खमंग!! अगदी पाकातला! एकदम पेशल!! नीट जमला नाही तर खाताना टाळूला चिकटतो! पाक कच्चा असेल तर ढापकन् तोंडातल्या तोंडात फुटतो!! :) पण जर जमला तर बेसनाचा लाडू तो बेसनाचाच लाडू हो! मग याच्यासारखा दुसरा कोण नाही!!

क) मोतिचुराचा लाडू आवडणारे मनोगती -

सुलक्षणा, कैरी, परीक्षित, संवादिनी, व्यक्त-अव्यक्त, वरदा, सचिन म्हेत्रे, अमित कुलकर्णी, अभिजित पापळकर, मृदुला, टग्या, साती, राहूल१, सुखदा, लिखाळ, अदिती, सुचरिता, अंजली, लीना, माफी, पाटील.

मोतीचुराचा लाडू दिसतो कसा पहा! नुसतं याच्याकडे पहात रहावं असा!! एकदम आकर्षक खमंग़ पिवळ्या रंगाचा, मंगलमयी!! मध्येमध्ये बेदाणे, केशर असलेला, साजुक तुपातला!! नेहमी कोणती तरी मंगलमयी वार्ता सांगणारा!! हा लाडू आवडणारी माणसं म्हणजे काय विचारता मंडळी! उत्साहाचे झरेच असतात एक एक. एकदम उत्सवप्रिय माणसं. एकदम जिंदादिल जमात. दे धमाल सगळी! साला कल किसने देखा है? जे काय करायचं आहे ते आजच आणि आत्ता! पिकनिकला जायचंय? जागरणं, धमाल करायची आहे? नाटक-सिनेमाला जायचंय? या मंडळींना सोबत घेऊन जा! ज्यांच्या आजूबाजूला ही मंडळी असतील त्यांना अगदी छान कंपनी मिळते. दोस्ती-यारीला एकदम मस्त माणसं असतात ही. आयुष्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने बघतात. कुठलंही काम मनापासून आणि जीव लावून करतील. कशात तरी नेहमी झोकून देण्याची यांची वृत्ती असते. अगदी सगळ्यांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करून दाखवण्याची क्षमता असते यांची. वृत्तीने तशी मनस्वी असतात. ज्या उत्साहाने पिकनिकला दोन दोन दिवस धमाल करतील त्याच उत्साहाने रूग्णालयात एखाद्याच्या खाटेपाशी रात्र रात्र बसून सेवाही करतील!

असो... तर मंडळी, हा झाला लाडवांचा अहवाल! माझे हे तीनही लाडू आपण गोड मानून घ्याल याची खात्री आहे. पहा, लाडवांच्या आवडीनिवडीतसुद्धा आपल्याला तीन प्रकारची वेगवेगळी माणसं पहायला मिळाली! माझं वरील विवेचन कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही. रव्याच्या लाडवातला एखादा गुण मोतिचुरातदेखील सापडेल. तसा तो सापडला तर माझं काहीच म्हणणं नाही. नाहीतर लगेच मला धारेवर धराल! थोडी गंमत म्हणून वरील प्रकाराकडे पहा आणि मोकळे व्हा. अगदी नाही म्हटलं तरी कोणाला कोणता लाडू आवडतो ही माहिती तर मिळाली आपल्याला! हेही नसे थोडके..

मी आधीच म्हटलं आहे की मनुष्य स्वभाव हे एक अजब रसायन आहे. अनेक भावभावनांची ही एक मिसळ आहे. आपण आपलं शोध घेत रहायचं. मला हस्ताक्षराचं माध्यम खूप जवळचं वाटतं. पण ते इथे शक्य नव्हतं. मग म्हटलं करायचं काय? चला लाडवांचा प्रयोग करून पाहू. यातून माझा मात्र खूप फायदा झाला. अनेक मनोगतींचे मला अगदी आपुलकीचे व्य नि आले. अगदी आयुष्यातलं सर्वात मोठं गूज सांगावं अश्या थाटात मंडळींनी मला त्यांचे आवडते लाडू कळवले, या गोष्टीचं मला हे लिहिताना अगदी भरून आलं आहे.

एखाद्याला गोड साद घातली की प्रतिसाददेखील गोडच मिळतो. तो मला व्य निं च्या माध्यमातून भरभरून मिळाला इतकंच!!

--तात्या अभ्यंकर.

February 20, 2007

दैनिक "कोकणच्या गजाली"....

दैनिक "कोकणच्या गजाली"
२०-०२-२००६.

प्रशासकीय अनुमतीचा निषेध

मंगळ २०. मनोगत डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रशासकीय अनुमती लागू होऊन आज बरेच दिवस झाले. या विरोधात मनोगतावरील एक सभासद श्री विसोबा खेचर यांनी उभारलेला लढा आता दिवसेंदिवस तीव्र होत जाईल अशी चिन्हे दिसत आहेत, असे आमचा 'हलकट कोकणी' हा विशेष वार्ताहार कळवतो.

प्रशासकीय अनुमतीचा निर्बंध उठवण्याबाबतचे सविस्तर निवेदन देण्यासाठी अमेरिकेतील मनोगत डॉट कॉम च्या मुख्यालयासमोर मनोगतींचा महासागर उसळला होता. देवगड तालुक्यातील नारिंग्र, दहिबाव येथून हा मोर्चा सुरू झाला आणि त्यात ठिकठिकाणचे मनोगती मोठ्याप्रमाणावर सामील झाले. मोर्च्याचे नेतृत्व श्री विसोबा खेचर यांनी केले. इतरही काही मनोगती या नेतृत्वामध्ये होते, परंतु 'आपापसात' च्या आचारसंहितेमुळे त्यांची नांवे आमचा वार्ताहार कळवू शकला नाही. 'आपापसात' च्या आचारसंहितेमुळे मनोगतचे पुणे वार्ताहार श्री संजोप राव यांची या आधीची बातमी दैनिक 'कोकणच्या गजाली' मध्ये छापून आली नव्हती. हलकट कोकणी या आमच्या हुशार वार्ताहाराने यावेळी पुरेपूर ही काळजी घेतली असून 'आपापसात' ची आचारसंहिता या बातमीस लागू होणार नाही असे पाहिले आहे! ;)

अनेक स्तरावरून प्रशासकीय अनुमतीचा निषेध होत असून मुख्यमंत्री, पंतप्रधान, आणि अनेक मनोगतीय मंत्र्यांनी आज एकदिवसीय उपोषण केले. संध्याकाळी फक्त एक स्मॉल पेग व्हिस्की पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले. सोवळ्या मनोगतींनी अर्धा पेला दुधीभोपळ्याचा रस पिऊन उपोषण सोडले!

उद्या या बाबतची पुढील व्युहरचना ठरवण्यासाठी संत तात्याबा महाराजांच्या आश्रमात देशोदेशीच्या मनोगतींची एक सभा आयोजित करण्यात आली आहे. तात्याबांच्या आश्रमात या सभेची जय्यत तयारी सुरू असून कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे. संत तात्याबांनी सर्व मनोगतींची उत्तम बडदास्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

स्वत: तात्याबा महाराज मात्र आश्रमात नसून त्यांचा मुक्काम सध्या जुहूच्या बॉलिवुडमध्ये असून ते आज "तंग कपडे, आणि सेंसॉरशिप' या विषयावर भरलेल्या बॉलिवुडमधील सर्व नायिकांच्या दोन दिवसांच्या शिबिराला संबोधणार आहेत. काल या संदर्भात सेलिना जेटली, बिपाशा बासू, आणि राखी सावंत या नट्यांनी तात्याबांची आश्रमात भेट घेतली आणि त्यांना बळेबळे आपल्यासोबत जुहूला घेऊन गेल्या! त्यांच्या लाडीक आग्रहाला तात्याबा बळी पडले असे बोलले जात आहे.

नट्यांच्या शिबिरतलं व्याख्यान आटपून तात्याबा आज रात्री उशिरापर्यंत जुहूहून परतणार असून त्यांच्यासोबत राणी मुखर्जी दोन दिवसांकरता त्यांचा आश्रम पहायला येणार आहेत असे आमचा वार्ताहार कळवतो. उद्या मनोगतींच्या सभेला त्याही उपस्थित राहणार की काय अशी उत्सुकता काही पुरुष मनोगतींमध्ये दिसली.

" संत तात्याबा सध्या नट्यांच्यात मशगूल असून त्यांना मनोगताशी आणि प्रशासकीय अनुमतीशी वगैरे काहीही देणंघेणं नाही. इतर मनोगतींनी उगाचच्या उगाच त्यांना फुकटचा भाव देऊ नये " असे व्य नि विरोधी पक्षातल्या काही मंडळींनी इतर मनोगतींना पाठवले!

एकूणच प्रशासकीय अनुमतीच्या संदर्भात उद्याच्या संत तात्याबा महाराजांच्या मठातल्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून सर्व वृत्तपत्राचे, दूरदर्शन वाहिन्यांचे प्रतिनिधी उद्याच्या सभेकडे डोळे लावून बसले आहेत. प्रशासकीय अनुमतीच्या संदर्भात संत तात्याबा महाराज कदाचित स्वत:च मनोगताच्या अमेरिकेतील मुख्यालयाला भेट देतील अशी चिन्हे आहेत. त्यांच्याबरोबर राणी मुखर्जीही अमेरिकेला जाणार की काय अशी जोरदार चर्चा सध्या पत्रकारांच्या गोटात असल्याचे आमच्या हलकट कोकणी या वार्ताहाराने कळवले आहे.
========================================================
राम राम मनोगतींनो,
आज सहजच हा लेख माझ्या हातातून उतरला आणि तो मी प्रसिद्धी करता मनोगतावर सुपूर्त केला. पण प्रशासनाने हा लेखही simply reject केला!
या लेखात आक्षेपार्ह, किंवा शिविगाळ असलेला मजकूर, कुणाही मनोगतीचं नांव न घेता कुठलेही व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप केलेले नाहीत. तरीही प्रशासनाने हा लेख प्रसिद्ध केला नाही.
असो, ते मालक आहेत. त्यामुळे 'मर्जी त्यांची!' असं म्हणून गप्प बसण्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही! बरं, हा लेख नाकारला गेला तो कोणत्या कारणामुळे नाकारला याचं साधं दोन ओळींचं निवेदनही प्रशासकांनी दिलं नाही!
असो, नळीच्या आशेवर असलेल्या एखाद्या कुत्र्यासारखं शेपटी हलवत, प्रशासकाच्या मर्जीनुसार मान तुकवत मनोगताच्या दारात पडून राहणं यापुढे निदान मला तरी शक्य नाही. सबब आजच मी प्रशासकांना शेवटची विनंती करून माझे 'विसोबा खेचर' हे मनोगतीय खाते रद्द करायला सांगितले आहे. माझे येथील सर्व लेखन, प्रतिसाद त्यांनी काढून टाकावेत अशीही विनंती मी त्यांना केली आहे. यापुढे मनोगतावर विसोबा खेचर हे नांवसुद्धा कुणाला दिसणार नाही. तेव्हा मनोगतींनो, आमचा राम राम घ्यावा. आजपासून तात्याचं मनोगतावरचं दाणापाणी उठलं! अगदी कायमचं! खूप झाल्या विनंत्या नी आर्जवं!
प्रशासका, फोकलीच्या गेलास तू बाऽऽऽऽऽऽझवत! हा वेडझवा कोकण्या आता यापुढे तुझा मिंधा नाही!
मनोगतींनो,
यापुढे माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास मला tatya7@gmail.com या खात्यावर संपर्क साधावा. मी लिहिलेलं कधी काही वाचावसं वाटलं तर या माझ्या ब्लॊगवर आपण अवश्य भेट देऊ शकता.
मनोगताला असले १०० तात्या मिळतील, आणि तात्याला असली १०० मनोगतं मिळतील!
आजपासून तात्या मनोगताला मेला..
आता पुन्हा एकदा नव्याने डाव मांडू! इथेच माझ्या ब्लॊगवर!
माझ्या मर्जीनुसार, माझ्या तब्येतीत! ;)
अजून खूप काही पहायचं आहे, करायचं आहे. लिहिण्याच्या नवीन नवीन सोयी होतील. प्रशासकाची आणि महेश वेलणकरची गुर्मी काळाच्या ओघात जिरून जाईल!
धन्यवाद,
आपलाच,
तात्या.
========================================================
मी प्रशासकांना पाठवलेला शेवटचा व्य नि!
प्रशासक महोदय,

मला यापुढे मनोगतावर सभासद म्हणून रहायची इच्छा नाही. तरी आपण माझे 'विसोबा खेचर' हे खाते रद्द करावे. आजपर्यंतचे येथील माझे सर्व लेखन, प्रतिसाद येथे न राहिले तर मला अतिशय आनंद होईल. तरी लेखात्मक, प्रतिसादात्मक असलेले माझे येथील सर्व लेखन आपण लवकरात लवकर उडवून लावावे अशी लेखक म्हणून माझी इच्छा आहे.

येथील लिखाणावर लागू असलेल्या प्रशासकीय अनुमती बद्दल आपल्याकडून अद्याप काहीच स्पष्टीकरण नाही. तसेच आज मी एक लेख लिहिला होता तोही आपण प्रसिद्ध केला नाहीत. प्रसिद्ध केला नाहीत, तरी 'या या कारणास्तव आपले लेखन मनोगतावर प्रसिद्ध होऊ शकत नाही' असं सांगणारं अवघ्या दोन ओळींचं आपलं पत्र/खुलासाही नाही.

माझ्या मते ह्या सर्व गोष्टी "Bad Administrative Manners" मध्ये मोडतात. मनोगताच्या अश्या प्रशासकीय वातावरणाचा आता मला उबग आला आहे. सबब, मी यापुढे एक क्षणही इथे राहू शकत नाही. आपण माझी नांवनिशाणी येथून लवकरात लवकर नष्ट करावी!

मनोगताला अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद..

आपला,
तात्या.

February 18, 2007

दोन ओळींचं ऋण...

प्रिय महेश वेलणकर/प्रशासक,

मी तात्या अभ्यंकर, तुझ्या संकेतस्थळावरचा एक सभासद. गेले बरेच दिवस तुला एक जाहीर पत्र लिहीन म्हणत होतो. आज योग आला!

सर्वप्रथम अहो-जाहो, किंवा अरे-तुरे बद्दल. तुझं वय किती आहे हे मला माहीत नाही, ना मला ते जाणून घ्यायचं आहे. जरी तू माझ्यापेक्षा वयाने मोठा असलास तरी मी तुला अरे-तुरेच करणार आहे. तुझ्याबद्दल वाटणारी आपुलकी, हे एकच कारण यामागे आहे एवढंच लक्षात घे.

गेले काही दिवस मनोगत बंद होते. ते बंद व्ह्यायच्या आधी काही दिवस येथे लिहिल्या जाणाऱ्या लेखांना आणि प्रतिसादांना प्रशासकीय अनुमतीची अट नव्यानेच सुरू झाली. त्या आधी माझ्या आठवणीप्रमाणे कधीच या प्रकारची प्रशासकीय अनुमती मनोगतावर लिहितांना लागत नव्हती. त्यानंतर मनोगत बंद झाले, आणि काही दिवसांनी पुन्हा सुरू झाले. परंतु प्रशासकीय अनुमती, जी मनोगत बंद व्हायच्या आधी सुरू झाली होती, ती अजूनही तशीच आहे.

मी वेळोवेळी, जमेल तसा या प्रशासकीय अनुमतीचा विरोधच केला आहे. याचं प्रमूख कारण म्हणजे आम्ही लेख किंवा प्रतिसाद लिहिल्यावर तो छापून येण्यास ८ ते १० तास लागतात. त्यामुळे लेखनातील, विशेषत: प्रतिसादातील उत्स्फुर्तता निघून जाते. तू किंवा प्रशासक, (तू मालक आहेस, आणि प्रशासक म्हणून तू अन्य कुणाला नेमले आहेस, असा माझा समज आहे) जेव्हा मनोगतावर येता तेव्हाच प्रशासकीय अनुमतीच्या प्रतिक्षेत असलेले लिखाण प्रसिद्ध करता.

आत्तापर्यंत मी एक दोन वेळा याचा मनोगतावरही याचा जाहीर निषेध केला आहे. बरं, प्रशासकीय अनुमती लावलीस ती लावलीस पण त्यामागचं नक्की कारण काय, ती किती वेळा करता आहे, की कायमस्वरुपी आहे काय, याबद्दल एकदाही साधा दोन ओळींचा खुलासाही तू करू नयेस याचं खरंच खूप वाईट वाटतं रे!

मला हे मान्य आहे की हे संकेतस्थळ पूर्णत: तुझे आहे, आणि कुठलाही खुलासा करायला तू कुणालाही बांधील नाहीस. अरे पण आम्ही सगळे मनोगती तुझे कुणीच नाही का रे? अरे आजपर्यंत तुझ्या या संकेतस्थळावर आम्ही सगळे मनोगती एक कुटुंबीय म्हणूनच वावरलो ना? मग मालक म्हणून, किंवा एक कुटुंबप्रमूख म्हणून आमच्या एखाद्या तक्रारीवर खुलासा करण्याकरता साध्या दोन ओळींचंही तू देणं लागत नाहीस का रे?

"प्रशासकीय अनुमती" ही माझ्यासारख्या अनेक मनोगतींना पसंत नाही. पण कुणी उघडपणे बोलून दाखवत नाही. अरे सगळेच माझ्यासारखे तोंडाळ आणि शिवराळ नसतात रे! तुझ्या या तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम असलेल्या संकेतस्थळाच्या रुपाने लोकांना आपापले विचार व्यक्त करायला एक मुक्त व्यासपीठ मिळतं आणि "जाऊ द्या, प्रशासकीय अनुमती तर प्रशासकीय अनुमती, पण आपण लिहू या" असा साधा विचार करून मंडळी गप्प बसतात रे!

कोण आहेत ही सर्व मंडळी? हे मनोगती? तर सर्व मराठी माणसं! ज्यांना लिहायला, वाचायला तुझ्यामुळे एक सुंदर संकेतस्थळ मिळालं! मानतो बॊस, आम्ही सगळेच ते मानतो! अरे पण आमच्या एखाद्या तक्रारीवर मालक म्हणून तू किंवा तुझ्या प्रशासकानी आमच्याशी अवघ्या दोन ओळींचाही संवाद साधू नये? अरे इतके कोरडे कसे रे तुम्ही? तुम्हाला काय वाटतं आमच्याशी थोडाफार संवाद साधला, आमच्या शंकांना उत्तरं दिली की आम्ही तुमच्या गळ्यात पडू? तुमचं लांगूलचालन करायला लागू? तसं काही नाही रे. आम्ही इथे येतो ते केवळ मराठीच्या प्रेमापोटी. इथे आम्हाला लिहायला मिळतं आणि चागलंचुंगलं वाचायला मिळतं म्हणून! दुसरं काहीच कारण नाही एवढा विश्वस बाळग!

आता माझ्यापुरतं बोलतो. मी जे काही वेडंवाकडं लेखन करतो त्याला तुझ्या संकेतस्थळामुळेच आजपर्यंत प्रसिद्धी मिळाली. अनेक लोकांना माझं लेखन आवडलं आणि मला थोडीफार लोकप्रियताही मिळाली ती देखील केवळ आणि केवळ मनोगतामुळेच! जोपर्यंत मी मनोगतावर लिहीत होतो, तोपर्यंत इथे खूप धमाल केली, मजा केली. स्वत: भरभरून लिहिलं, इतरांच्याही लेखनाला मनमोकळे, दिलखुलास प्रतिसाद दिले. राजकारण केलं, कंपूबाजीही केली! ;)

मनोगताप्रमाणेच इतरही काही संकेतस्थळं आहेत, ब्लॊगची सोय आहे, मराठी माणसांचे १४ विद्या ६४ कला, पुलकीत सारखे याहू ग्रुपही आहेत. मी तिथेही लिहू शकतो. लोकांना माझं लेखन आवडलं तर ते तिथेही आवडीने वाचलं जाईल. नाही असं नाही. पण या सगळ्यात मला मनोगतावरच लिहायला सर्वात जास्त आवडतं ही वस्तुस्थिती मी कधीही नाकारली नाही, आजही नाकारत नाही!

आणि या सगळ्याच्या बदल्यात मी तुझ्याकडे काय मगितलं रे? तर फक्त प्रशासकीय अनुमती रद्द करावी इतकंच ना? बरं बदललेल्या मनोगताच्या धोरणां, तत्वांनुसार ही प्रशासकीय अनुमती तशीच राहणार असेल तर निदान तसं तरी लिही रे एखाददा! एक हाडाचा मनोगती म्हणून मी तेही मान्य करीन!

आता राहता राहिलं माझं तोंडाळपण आणि शिवराळपण. अरे पण खरं सांगू का? काही काही वेळा तुझ्या या सोवळ्या, कोरड्या, शिष्ठ वागणूकीचा, तुझ्या मौनाचा खूप राग येतो रे आणि मग माझ्या तोंडातून दोनचार शेलक्या कोकणी शिव्या निघून जातात! त्याबद्दल मी तुझी माफी मागू का रे? म्हणत असशील तर मागतो बुवा! अगदी बिनशर्त माफी मागतो!

असो, जे काही मनांत आलं ते इथे खरडलं आहे. कधी भारतात आलास तर भेटू आपण. अमेरिकेत परत जातांना तुला आमच्या देवगडी आंब्यांची एक पाटी भेट म्हणून देईन हो! ;)

शेवटी निर्णय तुझा आहे. कारंण मनोगत तुझं आहे, तू मालक आहेस! मला अपेक्षा आहे ती फक्त तुझ्या दोन ओळींची! आणि तेवढ्या दोनच ओळींचं तू माझं देणं लागतोस रे! तुझ्या प्रशासकामार्फत जरी या दोन ऒळी लिहिल्यास तरी माझी काही हरकत नाही. 'महेश' या नांवनेच लॊगीन व्हायला पाहिजे असा माझा आग्रह नाही! ;)

असो, तुझ्या ऋणाची आठवण करून देण्याकरता हा लेखनप्रपंच!

तुझा,
तात्या.

बरळणे, बकणे, वगैरे वगैरे...

राम राम मंडळी,

हा लेख फक्त मनोगत या संकेतस्थळावरील सभासदांकरताच आहे. इतरांनी कृपया हे लेखन वाचू नये, कारण त्यांना या लेखाचा संदर्भ लागणार नाही. त्यातूनही त्यांनी वाचल्यास माझी काहीच हरकत असू शकत नाही. बापड्या तात्या अभ्यंकराचा ब्लॊग बाचून फुकटची कुणाची करमणूक झाली तर बरंच आहे की! ;)

तर बरं का मंडळी, आमच्या मनोगत या संकेतस्थळावर एक प्राणी आहे. नांवात काय आहे म्हणा? पण या लेखाच्या सोयीकरता आपण त्याला "माधव" म्हणू! सुरवातीला त्याचं आणि माझं तसं बरं होतं. पण हल्ली मात्र माधव माझ्यावर विशेष मेहेरबान आहे!

नुकताच माझे मनोगती मित्र संजोप राव यांनी त्यांच्या चावडीवर "पहिला दिवस -१" हा लेख प्रसिद्ध केला. तो आपल्याला इथे पाहता येईल. --

http://sanjopraav.wordpress.com/2007/02/

या लेखाला मी माझ्या पद्धतीने एक प्रतिसाद टाकला. आता बघा हां मंडळी कशी गंमत आहे ती. लेख लिहिला संजोप रावांनी, तो सुद्धा त्यांच्या चावडीवर. त्याला मी प्रतिसाद पाठवला त्यांच्याच चावडीवर, आता या सगळ्यात माधवचा संबंध कुठे आला? कुठेच नाही! बरं, संजोप राव यांच्या लेखाला जो मी प्रतिसाद दिला आहे, त्यातही मी कुठे माधवाचा उल्लेख केला नाही! माझा प्रतिसाद मनोगत या संकेतस्थळाच्या प्रशासना आणि मालकाच्या संदर्भात होता.

पण मंडळी, असंबद्ध बडबड माधव नाही करणार तर दुसरं कोण करणार?? ;) माझ्या प्रतिसादाचा माधवाच्या मठ्ठ विचारसरणीवर व्हायचा तो परिणाम झालाच! हे सगळं वाचून माधवाचा तोल सुटला आणि तो काहीबाही बरळू लागला!

त्या बरळण्यात म्हणे त्यांने एका विशिष्ठ मनोवृतीचा धिक्कार वगैरे केला आहे. बरं, "व्यक्तिचा नव्हे तर मनोवृतीचा धिकार करतो" अश्या साळसूदपणाचा एवढा आवच आणायचा होता, तर माझं नांव घेऊन, मला नतद्रष्ट वगैरे विशेषणं तरी लावायची नाहीत! अरे माधवा, तू मनोवृत्तीचा निषेध करतो आहेस ना? मग माझं नांव कशाला घेतोस? पण ही विसंगती तुझ्या लक्षात आली असती तर मी तुला मठ्ठ डोक्याचा कशाला म्हटलं असतं?? ;)

माधवाच्या या बरळण्याचा जरा इथे खरपूस समाचार घ्यावा ह्या हेतूनेच हा लेख लिहीत आहे, आणि म्हणूनच ही प्रस्तावना! माधवाच्या बरळण्यातला भाग लाल अक्षरात, माझ्या समाचाराचा भाग हिरव्या!

तैय्यार तर मग मंडळी? ;)

काही व्यक्ती जेथे जातात तेथे वादंग निर्माण करतात...हे स्पष्टपणे सांगायचे झाल्यास तात्या राव अभ्यंकर चे उदाहरण देता येईल.

असं का? बरं बरं!! ;)

सन्जोप रावांच्या इतक्या सुरेख लेखनाचा त्याने अक्षरश: चुथडा केला !!!

म्हणजे नक्की काय केलं रे? आणि संजोपच्या लेखातलं प्रमूख पात्र मीच तर आहे! माझ्याच स्वप्नातल्या "मनोगत भांडणकला महाविद्यालया" वर आधारित तर हा लेख आहे! कधी काळी हे सदर मीच मनोगतावर टाकलं होतं!! ;) म्हणून तर राव साहेबांसारख्या लोकांच्या प्रतिभेला घुमारे फुटले आणि त्यावर "पहिला दिवस-१" ही लेखमाला राव साहेबांनी सुरू केली! काय रावशेठ, खरं की नाही? ;)

पाचकळ व पांचट प्रतिसाद टाकून एखाद्या चांगल्या कलाकृतीचे सौंदर्य नष्ट करायचे हा त्याचा उद्योग बऱ्याच जणांच्या लक्षात आलेला आहे.

म्हणजे कुणाकुणाच्या रे? अरे निदान दोन-चार नांवं तरी घे की! ;)

त्यावरही पुढे जावून आपल्या मित्रमंडळींपैकी एखाद्याला / एखादीला आपल्या प्रतिसादाच्या बरोब्बर विरुद्ध प्रतिसाद टाकावयास लावणे हा तर अक्षरशः हलकट पणाचा कळस झाला......

कोण रे माझी मित्रमंडळी? कोणी माझ्याविरुद्ध प्रतिसाद टाकला आहे? अरे माधवा, असं असंबद्ध बरळण्याची तुझी सवय केव्हा जाणार रे?? ;) आणि हलकतपणाचा कळस?? अरे लेका मी तर हलकटपणाला अजून सुरवातदेखील केलेली नाहीये! ;) कळस बघशील तर फीट येऊन पडशीलंच! :D

फक्त मीच काय तो हुशार व सर्वांनी मलाच डोळ्यातले काजळ बनवून बसावे....किंवा मीच बोलणार बाकीच्यांनी फक्त ऐकण्याचे काम करावे ह्या प्रवृत्तीला माझा सुरूवाती पासून विरोध होता, आहे व ह्यापुढेही असणार आहेच.

हो का? छान छान! कर कर, तू फक्त विरोधच कर! तुला कोणी विचारो, वा न विचारो! आपण पण साला सामील आहे तुझ्या या विरोधयात्रेत! ;)

परंतु मनोगतावरील शुद्ध व पवित्र वातावरणाचा बट्ट्याबोळ करण्यास ह्या व अशाच प्रवृत्ती कारणीभुत आहेत.

उगी उगी! उगाच शुद्ध आणि पवित्र वातावरणाच्या नांवाखाली जास्त Excite होऊन फुकाचे गळे नको काढूस! ;) काय पण म्हणे, शुद्ध आणि पवित्र वातावरण! माऽऽऽऽऽऽऽय फूट!

तात्या अभ्यंकर सारख्या नतद्रष्ट माणसांचा विरोध करणे हा ह्या पत्रामागचा मुळ हेतू नाही, हे खास येथे नमुद करावे लागत आहे.

शाब्बास रे माझ्या माधवा! आता कुठे तू बरं लिहू लागला आहेस! मला "नतद्रष्ट" ही पदवी बहाल केल्याबद्दल तुला सौ सौ धन्यवाद! ;)

आपण संघटीत होऊन व्यक्ती विरोधात नव्हे तर प्रवृत्ती विरोधात आपले स्पष्ट मत मांडणे आवश्यक झाले आहे.

व्हा व्हा! संघटीत व्हा! या संघटनेचा म्होरक्या तू काय रे माधवा? ;)
कळू तरी देत तुझ्या संघटनेत आणखी कोण कोण मंडळी आहेत ते तरी!! की ही संघटना म्हणजे तुझी एक फॅन्टसी तर नव्हे ना? नाही, दिवसाउजेडी तुला स्वप्न पहायची सवय आहे म्हणून विचारतो!


ह्या मागचे उद्दीष्ठ म्हणजे बहुसंख्य वर्ग आपण वादाला कारणीभुत होऊ नये म्हणून किंवा वादात ओढले/फरफटले जावू नये म्हणून असल्या प्रवृत्तींपासून अंतर ठेवणे जास्त पसंत करतो.

हे कबूल!

ओघाओघाने चांगल्या लेखनाला प्रोत्साहनात्मक प्रतिसाद मिळत नाही व जेणेकरून निर्माता कंटाळून लेखन कमी करून टाकतो ह्यानेच, ह्या प्रवृत्तींचे इप्सीत साध्य होते.

धन्य आहे तुझी माधवा! हा शोध तुला केव्हा, कुठे व कसा लागला हे सांगशील? प्रोत्साहनात्मक प्रतिसाद मिळाले नाहीत म्हणून सर्जनशील व्यक्ति आपली अभिव्यक्ती थांबवत नाहीत! नव्हे, ती त्यांनी थांबवूही नये! आणि प्रोत्साहनत्मक प्रतिसाद द्यायचे, की निराशाजनक प्रतिसाद द्यायचे, की प्रतिसाद द्यायचेच नाहीत, हा निर्णय शेवटी मायबाप वाचकांचा! हो की नाही रे माधवा? ;)

कितीही म्हटले की वाचक/रसीक सुज्ञ आहेत तरी कावे व बारकावे लगेच लक्षांत न येता जनमताबरोबर सर्वसामान्य वाहवले जातात.

अरेच्च्या! कमालच करतोस! तू आहेस ना सर्वसामान्यांची होडी नीट वल्ल्हवून तिला मार्गस्थ करायला! इतक्यात हिम्मत हरलास? ;)
काय पण म्हणे, सूज्ञ काय, कावे-बारकावे काय, जनमत काय, सर्वसामान्य वाहवले जातात काय? अरे माधवा, झेपेल एवढंच बोलावं रे!

आपण सर्वांचा वावर मनोगतावर सदोदीत असतो व तो सुखकारक व तसाच कायम ठेवायचा झाल्यास असल्या प्रवृत्तींविरूद्ध आवाज नाही उठवता आला तरी त्यांना खतपाणी घालू नये म्हणजेच तो सदोदीत तसाच राहील हे माझे आपणा सर्वांस कळकळीचे आव्हान आहे.

अरे हो हो माधवा! जरा थांब की लेका. अरे मी संजोप रावांच्या चावडीवर माझा प्रतिसाद लिहिलाय रे! आणि तू मनोगताच्या नांवाने उगाच का ऊर बडवतो आहेस? अरे तात्या अभ्यंकर काय आहे, कसा आहे, हे मनोगतींना चांगलं माहित्ये रे माधवा! तू कशाला उगाच काळजी करतोस? तुला काय वाटलं, तात्या अभ्यंकर कसा आहे, काय आहे हे तू सांगितलंस तरच मनोगतींना कळेल? की तूच काय तो एकटा शहाणा आणि बाकी सगळे चुत्ये अशी तुझी समजूत आहे?


हां, संजोप रावांच्या चावडीवरील लोकांचा वावर सुखकर व्हावा असं म्हणत असशील तर गोष्ट वेगळी! :D

असल्या प्रवृत्तींविरूद्ध आवाज नाही उठवता आला तरी त्यांना खतपाणी घालू नये म्हणजेच तो सदोदीत तसाच राहील हे माझे आपणा सर्वांस कळकळीचे आव्हान आहे.

आवाऽऽऽऽऽऽऽज कुणाचा?? माधवाचा!!! अरे तुझ्या त्या संघटनेचं काय झालं रे? अरे थोड्यावेळापूर्वी तर आवाज उठवण्याच्या बाता मारत होतास. आणि आता इतक्यात "आवाज उठवण्याऐवजी खतपाणी घालण्याचं" शेपूट घातलंस! धत तुझी!! ;)

मी माझ्या काही मित्रांना हा लेख वाचण्याची विनंती केली ही माझी चूक तर नाही ना ह्याचा (इतपत) विचार करावा लागत आहे; ह्यावरून माझ्या सध्याच्या मन:स्थितीची कल्पना आपणांस येऊ शकेल.......

उगी उगी! शांत हो.. तुझी एकंदरीतच मनस्थिती सध्या ठीक नाहीये हे आम्हाला माहीत आहे! काळजी घे बाबा! आणि लवकर बरा हो!

तुझा,

तात्या.

February 13, 2007

मन रामरंगी रंगले..



राम राम मंडळी,

खालापूर! कर्जत-खोपोली जवळचं एक लहानसं गाव. अण्णा सोमठणकर हे खालापूरचेच राहणारे. अण्णा वृत्तीने भाविक माणूस. गेली अनेक वर्ष खालापूरला अण्णांच्या घरी दत्तयंतीचा उत्सव साजरा केला जातो, आणि त्या दिवशी रात्री त्यांच्या घरी गाण्याचा कार्यक्रम असतो. मंडळी, आज गेली ५३ वर्ष अण्णा सोमठणकरांच्या घरी हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे ही गोष्ट मला खूप मोठी वाटते. अनेक कलाकारांनी तिथे आजपर्यंत हजेरी लावली आहे.

गेल्या वर्षी अण्णांच्या घरी दत्तजयंती उत्सवानिमित्त आयोजलेल्या मैफलीला उपस्थित राहण्याचा मला योग आला. त्या मैफलीचा हा थोडासा धावता वृत्तांत आज मी येथे देणार आहे. पण ती मैफल कशी रंगतदार होती हे एक श्रोता म्हणून (समिक्षक किंवा तज्ज्ञ म्हणून नव्हे!;) सांगण्यापूर्वी एक खवैय्या म्हणून अण्णा सोमठणकरांच्या घरी जे प्रसादाचं जेवण होतं त्याबद्दल मला आधी बोललं पाहिजे. आहाहा काय विचारता मंडळी!, अगदी मोजकाच, पण अतीव सुंदर आणि चविष्ट बेत होता हो. रस्साभाजी, मउसूत पोळ्या, जीव ओवाळून टाकावा अशी गुळ-गोडामसाला घातलेली आमटी आणि गरमागरम भात. नास्तिकतेला आस्तिकतेकडे नेणारा स्वयंपाक! अहो देव म्हणजे तरी अजून वेगळं काय असतं हो? हे नास्तिक लोक उगाचंच आमच्या विठोबाला घाबरतात! ;)

असो, खाण्याचा पोटोबा तर झाला. आता गाण्याच्या विठोबाकडे वळुया!

ठाण्याची राहणारी सौ वरदा गोडबोलेची मैफल होती ती. वयाच्या ६ व्या/७ व्या वर्षापासूनच वरदा गाणं शिकत आहे. किराणा घराण्याचे पं फिरोज दस्तूर यांचे ज्येष्ठ शिष्य पं अच्युतराव अभ्यंकर यांच्याकडे वरदाने १२ वर्ष गाण्याची रीतसर तालीम घेतली. अभ्यंकरबुवांनी वरदावर किराणा गायकीचे खूप चांगले संस्कार केले. त्यानंतरचा काही काळ तिने डॉ सुशिलाताई पोहनकर व पं अजय पोहनकर यांच्याकडेही तालीम घेतली. सुशिलाताईंकडे आणि पं अजय पोहनकरांकडे वरदाला विशेष करून ठुमरी-दादऱ्याच्या खासियती शिकायला मिळाल्या. सध्या वरदा पं यशवंतबुवा महाले यांच्याकडे अण्णासाहेब भातखंडे, आचार्य रातंजनकर, यांच्या अत्यंत समृद्ध परंपरेतील आग्रा घराण्याच्या गायकीचे, विशेष करून बंदिशींचे शिक्षण घेत आहे.

आजपर्यंत अनेक ठिकाणी वरदाची गाणी झाली आहेत. ख्यालगायनाच्या स्पर्धांतून अनेक बक्षिसं, आणि शिष्यवृत्त्या तिने मिळवल्या आहेत. खास करून केन्द्र सरकारची दिली जाणारी शिष्यवृत्ती, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी शिष्यवृत्ती, राष्ट्रीय पातळीवर दिले जाणारे 'डागर पारितोषक', अण्णासाहेब रातंजनकर प्रतिष्ठानचे पारितोषक, पं रामभाऊ मराठे नाट्यसंगीत शिष्यवृत्ती, ह्या काही विशेष उल्लेखनीय गोष्टी तिच्या खात्यात जमा आहेत. रुईया महाविद्यालयातून संस्कृत विषय घेऊन बी ए च्या परीक्षेत मुंबई विद्यापिठात सर्वप्रथम येण्याचा मानदेखील तिने मिळवला आहे.

वरदाने मैफलीची सुरवात पुरियाकल्याण रागाने केली. "आज सो बन" ही पारंपारिक विलंबित एकतालातली अस्थाई तिने भरायला सुरवात केली. पुरियाकल्याण हा खास किराणा घराण्याचा राग असं म्हटलं जातं ते फारसं वावगं नाही. पुरियाकल्याण! आलापप्रधान गायकी गाता येण्याजोगा एक खानदानी राग. पुरियाकल्याण म्हणजे पुरिया आणि कल्याण या दोन रागांचं अद्वैत. पुरियाचा स्वभाव तसा गंभीर. मला तर पुरिया म्हणजे एखाद्या जबाबदार, बुजुर्ग अशा अनुभवसंपन्न व्यक्तिचं मनोगतच वाटतं. पण पुरियाची सगळी सत्ता फक्त पूर्वांगातच बरं का मंडळी. आपला अवखळ, लोभसवाणा 'कल्याण' त्याला उत्तरांगात नेमकेपणाने गाठतो आणि त्याचा छानसा पुरियाकल्याण होतो!

आपल्या घरात अशीच एखादी अनुभवसंपन्न, पण थोडी गंभीर अशी बुजूर्ग व्यक्ती असते. कुणी फारसं तिच्याजवळ गप्पाबिप्पा मारायला जात नाही. पण तिच्या नातवाला मात्र नेमकं कळतं की आजोबांना काय आवडतं आणि काय नाही ते! ;) नातू अवखळपणाने धावत त्यांना बिलगतो आणि या गंभीर आजोबांच्या चेहऱ्यावर पटकन स्मित हास्य उमटतं! ;) पुरिया काही क्षणाकरता स्वत:चा स्वभाव विसरतो आणि त्याचा पुरियाकल्याण बनतो! ;) मंडळी, किती समृद्ध आहे आपलं संगीत! क्या केहेने..

वरदाने किराणा गायकीच्या पद्धतीनुसार एकेका स्वराची बढत करत विलंबितात पुरियाकल्याण छानच रंगवला. त्यानंतर "पार करो नाव मोरी" ही पुरियाकल्याणातली पं फिरोज दस्तुरांनी बांधलेली द्रुत बंदिशीही तिने फार सुरेख म्हटली. अर्धापाऊण तास अगदी झकास माहोल जमला होता पुरियाकल्याणचा!
त्यानंतर मैफलीमध्ये केदार महाराजांचा रथ मोठ्या दिमाखात डेरेदाखल झाला. केदार राग म्हणजे काय विचारता महाराजा? स्वरांचा उत्सवच तो! 'सोच समझ मनमीत पिहरवा' ही गुरूमहात्म्य सांगणारी केदारातली मध्यलयीतली एक बंदिश. वरदाने ही बंदिश अगदी जमून गायली. मंडळी, 'मध्यलयीत गाणं सर्वात कठीण' असं बुजुर्ग सांगतात. वरदाने मात्र मध्यलयीचं तंत्र चांगल्या तऱ्हेने हाताळत ही बंदिश उत्तम तऱ्हेने सादर केली. केदाराने मैफलीच्या शोभेला चार चांद लावले!


त्यानंतर वरदाने 'मधुकर वन वन', 'सोहम हर डमरू बाजे', यांसारखी काही नाट्यपदं, 'हरी मेरो जीवनप्राण आधार', 'मन हो रामरंगी रंगले' हे अभंग सादर केले. उत्तरोत्तर मैफल चढत्या भाजणीने रंगतच गेली! श्री समय चोळकर यांनी तबल्यावर अत्यंत रंगतदार साथ केली व श्री निरंजन लेले यांनी संवादिनीवर समर्पक संवाद साधला.

मंडळी, एकूण कालची मैफल ऐकून माझ्यासारख्या श्रोत्यांना वरदासारख्या तरूण मंडळींकडून खूपच आशा आहेत. वरदाही ठाण्याचीच असल्यामुळे गेली अनेक वर्ष तिची मेहनत आणि लगन मी फार जवळून पाहतो आहे. सुरेख आणि सुरेल आवाज, स्वच्छ दाणेदार तान, लयतालावर चांगली पकड, सरगम आलापी, उत्तम तालीम मिळाल्यामुळे रागावरची पकड, ह्या गोष्टी तर वरदाच्या गाण्यात आहेतच. पण घराण्यांच्या परंपरा राखून गाण्यात स्वत:चे विचार मांडण्याची, आणि त्यादृष्टीने अत्त्यावश्यक ते चिंतन-मनन-अभ्यास व रियाज करत राहण्याची तिची वृत्ती नक्कीच कौतुकास्पद आहे.

sms मागवून मांडला जातो तो संगीताचा बाजार! ते संगीत नव्हे! 'माझं गाणं आपल्याला आवडलं असेल तर please please please मला मत द्या' असा सांगितिक जोगवा मागणाऱ्या कलाकारांची मला अक्षरश: कीव येते. कुठल्याही कलाकाराची कला ही कुठल्याही sms ची मिंधी नसते, नसावी असं मला वाटतं! वीणाधारी, श्वेतवस्त्र परिधान केलेल्या प्रसन्न व तेज:पुंज मुद्रेच्या सरस्वतीला असं फाटक्या वस्त्रानिशी sms द्वारा मतांची भीक मागताना पाहिलं की खरंच खूप वाईट वाटतं! पण मंडळी, खरं तर ही सरस्वती नव्हेच, असंच म्हणायला हवं. ही तर संगीताच्या बाजारातली रस्त्यावर बसलेली एक बटीक! झी वाहिनीच्या दरबारातील एक बाजारबसवी रांड!

असो! विषयांतर पुरे करतो.

तर मंडळी सांगायचा मुद्दा असा, की गाणं ही इंस्टंट येणारी गोष्ट नव्हे. आणि इंस्टंट गोष्टी टिकत नाहीत असं आमचं ठाम मत आहे. आणि म्हणूनच आजच्या जमान्यात दूरदर्शनवरील निरनिराळ्या वाहिन्यांवरील सांगितिक कार्यक्रमात (की बाजारात?) रातोरात प्रसिद्ध व्हायचे मार्ग उपलब्ध असतांना, किंवा इतर काही इंस्टंट प्रलोभनांना बळी न पडता वरदासारखी तरूण मंडळी रियाज करत आहेत, साधना करत आहेत ही गोष्ट मला खूप मोठी वाटते! अभिजात संगीतासारख्या दुर्लभ विद्येच्या प्रवासाकरता माझ्या वरदाला अनेकोत्तम शुभेच्छा!


परवाच्या मैफलीत वरदाने 'मन हो रामरंगी रंगले' हा अभंग गायला. छान गायला, रंगवून गायला. मुळात सवाई गंधर्वांनी गायलेला हा अभंग! त्यानंतर त्यांचे शिषोत्तम पं भीमसेन जोशी यांनीही अत्यंत भावोत्कटतेने गायला, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. वरदाकडून हा अभंग ऐकत असताना नकळत मला पुण्याच्या आमच्या या स्वरविठोबाची आठवण झाली आणि डोळ्याच्या कडा ओलावल्या. भीमण्णा आता थकले आहेत. आयुष्यभर गाण्यालाच 'राम' मानून भीमण्णांनी साधना केली. गानविद्या साध्य केली. आमचं मन त्यांनी रामरंगी रंगवलं!

त्यांचा थरथरता हात वरदासारख्या तरूण मंडळींच्या डोक्यावरही सतत राहो हीच प्रार्थना!

--तात्या अभ्यंकर.

February 04, 2007

ओम् स्वरभास्कराय नम:


राम राम मंडळी,

आज ४ फेब्रुवारी. सकाळ झाली. नेहमीप्रमाणे उदयाचळी मित्र आला. त्या भास्कराची किरणे माझ्या मायभूला न्हाऊमाखू घालू लागली, आणि मला आठवण झाली ती एका स्वरभास्कराची! स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांची. आमच्या अण्णांची!

अण्णांनी आज वयाची ८५ वर्ष पूर्ण केली. पण मंडळी, कुठल्याही कलाकाराच्या बाबतीत वय हा तसा गौण मुद्दा. कलाकार वृद्ध होतो, पण त्याची 'कला' ही केव्हाही वयातीतच असते. लौकिकार्थाने अण्णांची कला आज ८५ वर्षांची झाली हे खरेच. पण त्या कलाविष्कारातील प्रत्येक क्षणाने माझ्यासारख्या कित्येकांना, "आज मी माझं संपूर्ण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलो" असंच वाटलं! अण्णांचा प्रत्येक स्वर अगणितांची आयुष्ये क्षणार्धात उजळून गेला, हा हिशोब कुठल्या कालगणनेत करणार आणि कुठल्या मापाने?

भारताच्या या अनभिषिक्त स्वरसम्राटाला माझा मानाचा मुजरा.

"भारतीय शास्त्रीय संगीताचा मानदंड", "भारतीय शास्त्रीय संगीताचा अध्वर्यू" अशी अनेक बिरुदं अण्णांच्या नांवामागे लावता येतील. पण अण्णांचं गाणं ऐकू लागलो की शब्दच तोकडे पडतात, किंबहुना संपतात!
जुनी पिढी आम्हाला नेहमी त्यांनी ऐकलेल्या कलाकारांचे दाखले देते. दुर्दैवाने आम्हाला ते कलाकार प्रत्यक्ष ऐकायला मिळाले नाहीत. एकिकडे या गोष्टीचं दु:खही वाटतं. पण त्याच वेळेला अण्णांचा स्वर कानी पडतो आणि आम्हीही किती भाग्यवंत आहोत याचा प्रत्यय येतो!

देवानं अलौकिक सुरांचं हे दान अगदी भरभरून, हातचं काहीही राखून न ठेवता, आमच्या पदरात घातलं ही किती भाग्याची गोष्ट! भीमसेनजींच्या स्वराने आमची ओटी भरली गेली. अण्णांचा मंग़लमयी स्वराने अवघा आसमंत भारावला, शुचिर्भूत झाला! साक्षात ब्रह्मस्वरच तो.. झाले बहु, होतील बहु, परंत यासम हा!
अण्णांच्या स्वरसमिधांनी सिद्ध केलेला हा "भीमसेन जोशी" नांवाचा गानयज्ञ गेली ८५ वर्ष अखंड सुरू आहे!!

मंडळी, शब्दांचं देणं मला नाही. काही अक्षरांची मोडकीतोडकी, कशीबशी जुळवाजुळव करून काहीबाही लिहितो झालं. आज अण्णांबद्दल दोन शब्द लिहयला बसलो आहे खरा, पण शब्दांची चणचण भासते आहे. हे माझ्यासारख्याचे काम नोहेच! याकरता कुसुमाग्रजांची, विंदांची, पुलंची प्रतिभाच हवी!
कविवर्य विंदा करंदीकर एके ठिकाणी अण्णांच्या सन्मानार्थ म्हणतात,

प्रिय भीमसेनजी,
अमृताचे डोही बुडविले तुम्ही
बुडताना आम्ही धन्य झालो
मीपण संपले झालो विश्वाकार
स्वरात ओंकार भेटला गा..!!

--तात्या.