February 20, 2007

दैनिक "कोकणच्या गजाली"....

दैनिक "कोकणच्या गजाली"
२०-०२-२००६.

प्रशासकीय अनुमतीचा निषेध

मंगळ २०. मनोगत डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रशासकीय अनुमती लागू होऊन आज बरेच दिवस झाले. या विरोधात मनोगतावरील एक सभासद श्री विसोबा खेचर यांनी उभारलेला लढा आता दिवसेंदिवस तीव्र होत जाईल अशी चिन्हे दिसत आहेत, असे आमचा 'हलकट कोकणी' हा विशेष वार्ताहार कळवतो.

प्रशासकीय अनुमतीचा निर्बंध उठवण्याबाबतचे सविस्तर निवेदन देण्यासाठी अमेरिकेतील मनोगत डॉट कॉम च्या मुख्यालयासमोर मनोगतींचा महासागर उसळला होता. देवगड तालुक्यातील नारिंग्र, दहिबाव येथून हा मोर्चा सुरू झाला आणि त्यात ठिकठिकाणचे मनोगती मोठ्याप्रमाणावर सामील झाले. मोर्च्याचे नेतृत्व श्री विसोबा खेचर यांनी केले. इतरही काही मनोगती या नेतृत्वामध्ये होते, परंतु 'आपापसात' च्या आचारसंहितेमुळे त्यांची नांवे आमचा वार्ताहार कळवू शकला नाही. 'आपापसात' च्या आचारसंहितेमुळे मनोगतचे पुणे वार्ताहार श्री संजोप राव यांची या आधीची बातमी दैनिक 'कोकणच्या गजाली' मध्ये छापून आली नव्हती. हलकट कोकणी या आमच्या हुशार वार्ताहाराने यावेळी पुरेपूर ही काळजी घेतली असून 'आपापसात' ची आचारसंहिता या बातमीस लागू होणार नाही असे पाहिले आहे! ;)

अनेक स्तरावरून प्रशासकीय अनुमतीचा निषेध होत असून मुख्यमंत्री, पंतप्रधान, आणि अनेक मनोगतीय मंत्र्यांनी आज एकदिवसीय उपोषण केले. संध्याकाळी फक्त एक स्मॉल पेग व्हिस्की पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले. सोवळ्या मनोगतींनी अर्धा पेला दुधीभोपळ्याचा रस पिऊन उपोषण सोडले!

उद्या या बाबतची पुढील व्युहरचना ठरवण्यासाठी संत तात्याबा महाराजांच्या आश्रमात देशोदेशीच्या मनोगतींची एक सभा आयोजित करण्यात आली आहे. तात्याबांच्या आश्रमात या सभेची जय्यत तयारी सुरू असून कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे. संत तात्याबांनी सर्व मनोगतींची उत्तम बडदास्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

स्वत: तात्याबा महाराज मात्र आश्रमात नसून त्यांचा मुक्काम सध्या जुहूच्या बॉलिवुडमध्ये असून ते आज "तंग कपडे, आणि सेंसॉरशिप' या विषयावर भरलेल्या बॉलिवुडमधील सर्व नायिकांच्या दोन दिवसांच्या शिबिराला संबोधणार आहेत. काल या संदर्भात सेलिना जेटली, बिपाशा बासू, आणि राखी सावंत या नट्यांनी तात्याबांची आश्रमात भेट घेतली आणि त्यांना बळेबळे आपल्यासोबत जुहूला घेऊन गेल्या! त्यांच्या लाडीक आग्रहाला तात्याबा बळी पडले असे बोलले जात आहे.

नट्यांच्या शिबिरतलं व्याख्यान आटपून तात्याबा आज रात्री उशिरापर्यंत जुहूहून परतणार असून त्यांच्यासोबत राणी मुखर्जी दोन दिवसांकरता त्यांचा आश्रम पहायला येणार आहेत असे आमचा वार्ताहार कळवतो. उद्या मनोगतींच्या सभेला त्याही उपस्थित राहणार की काय अशी उत्सुकता काही पुरुष मनोगतींमध्ये दिसली.

" संत तात्याबा सध्या नट्यांच्यात मशगूल असून त्यांना मनोगताशी आणि प्रशासकीय अनुमतीशी वगैरे काहीही देणंघेणं नाही. इतर मनोगतींनी उगाचच्या उगाच त्यांना फुकटचा भाव देऊ नये " असे व्य नि विरोधी पक्षातल्या काही मंडळींनी इतर मनोगतींना पाठवले!

एकूणच प्रशासकीय अनुमतीच्या संदर्भात उद्याच्या संत तात्याबा महाराजांच्या मठातल्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून सर्व वृत्तपत्राचे, दूरदर्शन वाहिन्यांचे प्रतिनिधी उद्याच्या सभेकडे डोळे लावून बसले आहेत. प्रशासकीय अनुमतीच्या संदर्भात संत तात्याबा महाराज कदाचित स्वत:च मनोगताच्या अमेरिकेतील मुख्यालयाला भेट देतील अशी चिन्हे आहेत. त्यांच्याबरोबर राणी मुखर्जीही अमेरिकेला जाणार की काय अशी जोरदार चर्चा सध्या पत्रकारांच्या गोटात असल्याचे आमच्या हलकट कोकणी या वार्ताहाराने कळवले आहे.
========================================================
राम राम मनोगतींनो,
आज सहजच हा लेख माझ्या हातातून उतरला आणि तो मी प्रसिद्धी करता मनोगतावर सुपूर्त केला. पण प्रशासनाने हा लेखही simply reject केला!
या लेखात आक्षेपार्ह, किंवा शिविगाळ असलेला मजकूर, कुणाही मनोगतीचं नांव न घेता कुठलेही व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप केलेले नाहीत. तरीही प्रशासनाने हा लेख प्रसिद्ध केला नाही.
असो, ते मालक आहेत. त्यामुळे 'मर्जी त्यांची!' असं म्हणून गप्प बसण्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही! बरं, हा लेख नाकारला गेला तो कोणत्या कारणामुळे नाकारला याचं साधं दोन ओळींचं निवेदनही प्रशासकांनी दिलं नाही!
असो, नळीच्या आशेवर असलेल्या एखाद्या कुत्र्यासारखं शेपटी हलवत, प्रशासकाच्या मर्जीनुसार मान तुकवत मनोगताच्या दारात पडून राहणं यापुढे निदान मला तरी शक्य नाही. सबब आजच मी प्रशासकांना शेवटची विनंती करून माझे 'विसोबा खेचर' हे मनोगतीय खाते रद्द करायला सांगितले आहे. माझे येथील सर्व लेखन, प्रतिसाद त्यांनी काढून टाकावेत अशीही विनंती मी त्यांना केली आहे. यापुढे मनोगतावर विसोबा खेचर हे नांवसुद्धा कुणाला दिसणार नाही. तेव्हा मनोगतींनो, आमचा राम राम घ्यावा. आजपासून तात्याचं मनोगतावरचं दाणापाणी उठलं! अगदी कायमचं! खूप झाल्या विनंत्या नी आर्जवं!
प्रशासका, फोकलीच्या गेलास तू बाऽऽऽऽऽऽझवत! हा वेडझवा कोकण्या आता यापुढे तुझा मिंधा नाही!
मनोगतींनो,
यापुढे माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास मला tatya7@gmail.com या खात्यावर संपर्क साधावा. मी लिहिलेलं कधी काही वाचावसं वाटलं तर या माझ्या ब्लॊगवर आपण अवश्य भेट देऊ शकता.
मनोगताला असले १०० तात्या मिळतील, आणि तात्याला असली १०० मनोगतं मिळतील!
आजपासून तात्या मनोगताला मेला..
आता पुन्हा एकदा नव्याने डाव मांडू! इथेच माझ्या ब्लॊगवर!
माझ्या मर्जीनुसार, माझ्या तब्येतीत! ;)
अजून खूप काही पहायचं आहे, करायचं आहे. लिहिण्याच्या नवीन नवीन सोयी होतील. प्रशासकाची आणि महेश वेलणकरची गुर्मी काळाच्या ओघात जिरून जाईल!
धन्यवाद,
आपलाच,
तात्या.
========================================================
मी प्रशासकांना पाठवलेला शेवटचा व्य नि!
प्रशासक महोदय,

मला यापुढे मनोगतावर सभासद म्हणून रहायची इच्छा नाही. तरी आपण माझे 'विसोबा खेचर' हे खाते रद्द करावे. आजपर्यंतचे येथील माझे सर्व लेखन, प्रतिसाद येथे न राहिले तर मला अतिशय आनंद होईल. तरी लेखात्मक, प्रतिसादात्मक असलेले माझे येथील सर्व लेखन आपण लवकरात लवकर उडवून लावावे अशी लेखक म्हणून माझी इच्छा आहे.

येथील लिखाणावर लागू असलेल्या प्रशासकीय अनुमती बद्दल आपल्याकडून अद्याप काहीच स्पष्टीकरण नाही. तसेच आज मी एक लेख लिहिला होता तोही आपण प्रसिद्ध केला नाहीत. प्रसिद्ध केला नाहीत, तरी 'या या कारणास्तव आपले लेखन मनोगतावर प्रसिद्ध होऊ शकत नाही' असं सांगणारं अवघ्या दोन ओळींचं आपलं पत्र/खुलासाही नाही.

माझ्या मते ह्या सर्व गोष्टी "Bad Administrative Manners" मध्ये मोडतात. मनोगताच्या अश्या प्रशासकीय वातावरणाचा आता मला उबग आला आहे. सबब, मी यापुढे एक क्षणही इथे राहू शकत नाही. आपण माझी नांवनिशाणी येथून लवकरात लवकर नष्ट करावी!

मनोगताला अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद..

आपला,
तात्या.

8 comments:

  1. Anonymous9:05 PM

    शेवटचा व्य. नि. का बरे पाठवला आपण तात्याराव? आपापसातमध्ये हे जाहीर टाकायचे होते. आपण मनोगतावरून निघत आहात हे प्रशासनाने कदाचित आनंदाने प्रकाशित केले असते.

    (ह. घ्या बरं का!)

    ReplyDelete
  2. Anonymous10:30 PM

    Tatyaa tumachi talmal samjate. Parantu tya prashasakala akkal naahi he aadhich siddha zale aahe tevha ugich dagadavar doke aapatanyat kahihi artha nahi. Mi manogat var vachak mhanun sudha jane kadhich band kele aahe. hya prashaskiy majurdya vrutticha nishedh marathi premache dhong karanarya velankarancha nishedh aani bayaki kavita lekha ajunahi lihinarya sheput ghalu manogatincha pan nishedh!!

    ReplyDelete
  3. Anonymous12:43 AM

    तात्या आताच मनोगतावर तुझी व्यक्तिरेखा बघून आलो.. अजुनही तुझे बरेच लिखाण मनोगतावर आहे.. प्रशासकाचा तोरा थोडा वितळू लागला आहे असे समजायचे का?.. मला तर त्या भोमेकाकाला प्रशासक केल्यापासून हे सगळे बिघडले असे वाटते.. सगळ्यात सोवळेधारी तोच आहे मनोगतावर!.. तात्या तू लिहिणे सोडू नकोस लिहित राहा..

    - देवव्रत

    ReplyDelete
  4. तो भोम्या शिंचा प्रशासक आहे अशी मला आधीपासूनच कल्पना होती. आता बघतो त्याला. आता माझा ब्लॊग आहे आणि मनोगत आहे. आता बघ कसा हाणतो एकेकाला! ;) अरे या वेलणकराला आणि भोम्याला देवगडचे फक्त आंबे माहित्येत रे! देवगडची माणसं अजून त्यांना माहीती नाहीत. जिथे अमेरिका संपते तिथे आमचं देवगड सुरू होतं! ;)

    तात्या.

    ReplyDelete
  5. तात्या आणि तात्याचा वाचकवर्ग (त्यात त्याच्या असंख्य मैत्रिणीही आल्याच),

    मी मनोगताच्या दुर्दशेविषयी आणि त्याला पर्याय म्हणून मी उभारणार असलेल्या एका संकेतस्थळाविषयी http://thebhandarkars.com/milind/archives/86 येथे लिहिलेले आहे. वाचा, आणि प्रतिसाद द्या.

    - सर्किट (मिलिंद)

    ReplyDelete
  6. Anonymous1:16 PM

    tatya, this mahesh velankar misused personal message facility on maayboli to attract members to manogat. He contacted many good members of maayboli individually and urged them to shift to manogat. He used personal message facility of maayboli for that.

    What can you expect from such unethical person ????

    ReplyDelete
  7. Anonymous4:39 PM

    ए xxxxx तात्या,
    नेहमी 'जातो जातो' म्हणत परत परत तिथेच येत असतो तू, आतातरी एकदाचा खरोखर फूट त्या मनोगतावरुन..तुझ्यासारखा फाटक्या तोंडाचा शिवराळ आणि जिभल्या चाटत नाडगौडा बाईची वर्णने करणारा पर्व्हर्ट शाब्दिक संडास मनोगतावरुन गेला तर आम्ही फटाके वाजवू!!

    ReplyDelete
  8. वाचका,
    तुझा प्रतिसाद आवडला. पण फक्त 'एक वाचक' असे नांव सांगून जी गांडूगिरी केलीस त्यापेक्षा खऱ्या नांवाने प्रतिसाद दिला असतास तर मर्द का बच्चा शोभला असतास. असो, अजून तू नुसताच बच्चा आहेस हेच खरे! ;)

    तात्या.

    ReplyDelete