दिदीचा स्वर, यमन आणि मधुबाला. विषय संपला!
अतिशय सुंदर गाणं. दिदीने अगदी मन लावून, आर्ततेने गायलं आहे. रिषभावरचा ठेहेराव, "गम'प" संगती, तार षड्ज, सगळंच सुरेख..संथ लय, सुंदर ठेका. यमनचं अजून एक वेगळंच रूप!
आज १४ फेब्रुवारी. व्हॅलेन्टाईन दिन आहे म्हणे. असेल..!
आम्हाला इतकंच माहीत आहे की आज मधुबालाचा जन्मदिवस आहे.. त्या जिवंतपणी दंतकथा बनलेलीचा जन्मदिन!
ती एक शापित यक्षिण! तिची मोहकता, तिचं सौंदर्य, तिची अदाकारी, तिचं हास्य, तिचा अभिनय, तिची प्रत्येक गोष्टच जगावेगळी होती, खानदानी होती!
जिथे सौंदर्याच्या सर्व व्याख्या संपतात, जिथे सुरेख-सुंदर-मधाळ-अवखळ-अल्लड-सौंदर्यवती-लावण्यवती-सौंदर्यखनी
इत्यादी अनेक शब्द केवळ अन् केवळ तोकडे पडतात! नव्हे, या शब्दांचा केवळ फापटपसाराच वाटतो..!
आम्ही रंभा, उर्वशी, मेनका वगैरे नाही पाहिल्या! पाहायची तितकिशी गरजही नाही. कारण..
....कारण आम्ही मधुबालेला पाहिलं आहे आणि तेवढंच आम्हाला पुरेसं आहे!
'दिलकी दिलही मै रही बात ना होने पायी..' असंच काहीसं घडलं या शापित यक्षिणीच्या प्रत्यक्ष आयुष्यातही..!
आज तिच्या जन्मदिनानिमित्त मिपा परिवार तिला साश्रू नयनांनी याद करत आहे...
-- तात्या अभ्यंकर.
I do not know for how long the URL given below will remain valid, but right now it hosts a song sung by Madhu Bala in a film named Pujari in 1946. The song sung by her in Basant under the name Baby Mumtaaz should be available on YouTube. 'तुम को मुबारक हो उंचे महल ये
ReplyDeleteham ko hai.n pyaaree hamaarii galiyaa.N' .
http://films.hindi-movies-songs.com/index-books.html
- dn
तो यमन, तो ऋषभ वगैरेचा जनक नौशादअलीचा एका शब्दानं उल्लेख केला असता तर काही बिघडलं नसतं. नौशादनं चाल रचली म्हणून लतानं गायली ना?
ReplyDeleteअन्यत्र आरडीवरदेखील तुम्ही स्तुतीसुमनं उधळलेली आहेतच.
>>तो यमन, तो ऋषभ वगैरेचा जनक नौशादअलीचा एका शब्दानं उल्लेख केला असता तर काही बिघडलं नसतं. नौशादनं चाल रचली म्हणून लतानं गायली ना?
ReplyDeleteविवेकराव, अगदी खरं आहे तुम्ही म्हणता ते.. नौशादसाहेबांचा उल्लेख राहिला खरा! चुकलंच..!
तात्या.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteथोडी sharp प्रतिक्रिया दिली त्याबद्दल sorry. पण संगीतकार हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळं अमरमधलं गाणं आणि नौशादअलींचा उल्लेख नाही हे एकदमच खटकलं. अन्यथा तुम्हाला मी याबाबतीत काय सांगावं?
जे जुनी गाणी ऐकतात त्यांना लता-रफी-किशोरची (आणि इतरांचीही) अनेक गाणी माहीत असतात, पण या अद्भुत गाण्यांचे जनक अंधारात गेलेत. लता-आशाला जवळजवळ देवत्व प्राप्त झालंय आणि ज्यांची गाणी गाऊन त्या दोघी महान गायिका झाल्या त्या संगीतकारांवर मात्र विस्मरणाचा पडदा पडलाय. याविषयात मला माझ्या मित्रांशी नेहमी डोकेफोड करावी लागते. मागं मी माझ्या ब्लॉगवर याबाबत थोडं लिहिलं होतं.
http://ramalkhuna.blogspot.com/2010/03/blog-post_19.html
विवेक.
थोडा वेगळा विषय, मधुबालाबद्दल वाचलेली घटना.
ReplyDeleteयाच अमरमधल्या ‘इक बात कहूँ मेरे पिया’ गाण्याच्या शूटींगच्या वेळची ही घटना. मधुबाला दिलीपकुमारच्या शेजारी बसलेली आहे. ‘सब कुछ है इन आँखोंमें जरा देख इधर तू’ या ओळी ऐकून दिलीपकडं पाहताना तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं (त्याकाळी शूटींगच्यावेळी रेकॉर्डवर गाणं वाजवलं जात असे). जणू तिच्या मनातले भावच गाण्यातून आणि त्या व्याकुळ सुरावटींतून व्यक्त होत होते.
आजही ते गाणं पाहताना मेहबूबच्या कॅमेर्यानं टिपलेला तो क्षण बघायला मिळतो. असं वाचलं होतं की तिचे अश्रू उत्स्फूर्त होते, मेहबूबनं तिला रडायला सांगितलं नव्हतं.
घटना खरी की खोटी माहीत नाही (म्हणजे ती रडलीय हे कॅमेर्यानं टिपलंय, पण उत्स्फूर्तपणे की ग्लिसरीन लावून हे माहीत नाही). पण मधुबालाच्या बाबतीत ही घटना घडू शकते असं वाटत राहतं. डोळ्यांत अश्रू आणण्यासाठी तिला ग्लिसरीनची गरज नसावी.
नौशादअलींच्या सुरावटी आणि आशाचे ते स्वर ऐकून आजही डोळे पाणावतात, तर मधुबालाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले यात नवल ते काय? त्यात त्या काळात ती दिलीपच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती.
अशी अजरामर गाणी निर्माण करणारे नौशादअली आणि ती ऐकून आपल्या भावना मुक्तपणे डोळ्यांवाटे वाहू देणारी मधुबाला पुन्हा होणार नाहीत, आणि आजच्या professional जगात दंतकथा ठरतील हेच खरं.
विवेक.
विवेकराव,
ReplyDeleteअतिशय सुंदर, माहितीपूर्ण प्रतिसाद..
धन्यवाद..
तात्या.
विवेकराव, आपल्या ब्लॊगवरील लेख वाचला.. प्रतिसाद कुठे द्यायचा?
ReplyDeleteतात्या.
तात्या
ReplyDeleteमाझ्या ब्लॉगवरच्या कॉमेंट्सची लिंक चुकून दिसेनाशी झाली होती. ती settingsमध्ये जाऊन दिसती केलीये.
आता तुम्हाला http://ramalkhuna.blogspot.com/2010/03/blog-post_19.html याठिकाणी प्रतिसाद देता येईल.
मी तुमच्या ब्लॉगची लिंक माझ्या ब्लॉगवर टाकलीये, जेणेकरून मला updates मिळत जातील.
काल रात्री कॉमेंट पोस्ट केल्यानंतर बराच वेळ ‘गुण गाईन आवडी’मधल्या पोस्ट्स वाचत होतो. वाचून काय वाटलं ते शब्दांत सांगता येत नाही. विशेषतः बाबूजी, कुमारजी, फिरोज़जी आणि गोविंदराव यांच्याबद्दल.
तुम्हाला या सर्वांच्या सहवासाचे क्षण लाभले ही किती मौल्यवान ठेव आहे!
विवेक.