मध्यमातलं एक छान गाणं.. 'नैना' शब्दाचा शुद्ध धैवतावरचा न्यास आगळावेगळा..! एकट्या शुद्ध धैवतामुळे गाणं तरलं आहे, नव्हे छान झालं आहे. ही जादू स्वरांची! 'लागे रे.. 'वरचा षडज अगदी समाधानकारक. नि़ध़सा.. वा! एकंदरीत मुखड्याचा फील छानच आहे. गाण्याचं एरेजिंग, ठेका, कोरस इत्यादी सर्व गोष्टीही उत्तम!..
गाण्याच्या चित्रिकरणाबाबत मात्र न बोललेलंच बरं. रणबीर कपूर नामक प्राणी हा धड 'He मॅन'ही दिसत नाही आणि धड 'She मॅन'ही दिसत नाही.. आमच्या ऋषी आणि नितू या गुणी दांपत्याच्या पोटी हे असं अंमळ खुळं कार्ट कसं काय निपजलं देव जाणे!
जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे
तबसे दीवाना हुआ, सबसे बेगाना हुआ
रब भी दीवाना लागे रे..
या ओळी छान.. मात्र,
जबसे तेरा आँचल ढला, तबसे कोई जादू चला..
ही ओळ जरा उथळच वाटते.. कवीला जळ्ळी बाईचा पदर ढळण्यात कसली जादू वाटते देव जाणे..! खरी जादू, खरा शृंगार हा पदराआडच आहे, झाकलेल्यातच आहे हे हल्लीच्या उघड्याबागड्या दुनीयेला कळत नाही हेच खरं! अनीलची मुलगी सोनम मात्र चांगली दिसते हो!
असो, एकंदरीत गाणं म्हणून विचाराल तर छानच गाणं!
-- तात्या अभ्यंकर.
No comments:
Post a Comment