गाणं कसं गावं, कसं मांडावं, स्वर कसे ठेवावेत, गाण्याच्या शब्दांतून त्यातली अदृष्य लय कशी जपावी... इत्यादी सा-या प्रश्नांची उत्तरं म्हणजे हे गाणं..हे गाणं म्हणजे तरलता.. हे गाणं म्हणजे एक कैफियत.. कैफियत इतकी सुंदर असू शकते?!
एखादं गाणं शब्दांच्या मुठीत पकडणं, त्याला व्याख्येत बसवणं हे मुश्किल काम..परंतु अप्रतिम गाण्याची व्याख्या करायचीच जर झाली तर त्याचं उत्तर म्हणजे हे गाणं..!
भूप रागावर आधारीत असलेलं हे गाणं.. हे गाणं म्हणजे 'ज्योती कलश छलके' चं भावंडं.. राग भूप! भूपाबद्दल काय बोलावं? त्याची सारी श्रीमंती त्याच्या नावातच! 'सारेगपधसां..' या त्याच्या सोन्याच्या मोहरा..! 'मनी' वर्ज्य असले म्हणून बिघडलं कुठं?!
ये रात केहेती है वो दिन गये तेरे,
ये जानता है दिल के तुम नही मेरे
खडी हू मै फिर भी
निगाहे बिछाए, मै क्या करू हाए, के तुम याद आये..
'ये जानता है दिल' मधले स्वरभाव केवळ शब्दातीत! 'खडी हू मै फिर भी..' मधल्या अनपेक्षित तार गंधाराचं तेज सूर्याला लाजवेल असं.. 'निगाहे बिछाए, मै क्या करू हाए, के तुम याद आये..' च्या अवरोही बॅलन्सिंग बद्दल काय बोलावं?!
थोरल्या बर्मनदांना, नूतनच्या निरागस सौंदर्याला आणि 'दीदी'नामक आश्चर्याला सलाम.!
-- तात्या अभ्यंकर.
ha bhoop aahe ki shuddha kalyaaN ? Tase chitrapaT sangeetaat raagaa baherche swar vaapartaat, pan hyachaa avaroh ha bhoop peksha kalyaaN vaLaNaachaa vaaTato. Hya gaaNyaachaa vichar kartaanaach "Rasik balamaa" kase vaaTate ? toch raag, mukhaDyaachi saadharaN tich suraavaT, pan pratibhavant sangeetkaar aapli kushaltaa aaplyaa angaane dakhavtaat. Interlude music madhye S-J aaNi SDB aapaaplyaa shaileet titkich asadharaN nirmitee sadhataat...
ReplyDeleteमाझे अत्यंत आवडते गीत आणि नूतनच्या अभिजात स्वर्गीय सौंदर्याने व अप्रतिम अदाकारीने तर मी सदाचीच भारलेली आहे.
ReplyDelete