..................याचे करू आता काय मला सांग.. (येथे ऐका)
काही गोष्टी घडतात तेव्हा कुणा एका व्यक्तिचं नव्हे, कुणा एका प्रांताचं, राज्याचं, देशाचं नव्हे, सार्या विश्वाचं नव्हे, एखाद-दुसर्या आकाशगंगेचं नव्हे तर सार्या अंतराळाचंच भाग्य उजळून निघतं. यमनचा जन्म झाला तेव्हा नेमकं हेच झालं..!
'गलगले निघाले' मधला जरा वेडासा खुळासा पण साधासा भोळासा भरत जाधव. त्याच्या प्रेमात पडलेली केतकी थत्ते. आणि मग या भरतच्या वर्णनाचं स्वरचित्र रेखाटताना अशोक पत्कींना आधार मिळतो यमनचा आणि एक छोटेखानी, जलद लयीचं नितांत सुंदर गाणं जन्माला येतं..!
बोले मनातील भाषा, याचा थोडासा हा लोचा, याचे करू आता काय मला सांग..!
गरे नी़नी़नी़ रे गरे , गरे म'म'म'म'म'म' म'धनीरेंनीध गरेगरेसा..!
तुम्ही अण्णांचा एखादा 'नामाचा गजर गर्जे भीमातीर.'. सारखा अभंग घ्या किंवा बाबूजींच्या 'समाधी साधन संजीवन नाम..' सारख्या लै भारीतल्या भारी ओळी घ्या.. किंवा मग '....याचा थोडासा हा लोचा याचे करू आता काय मला सांग..' या ओळी घ्या; आपला यमन सगळ्यांना पुरून उरतो हो. अक्षरश: त्या गाण्याचं सोनं करतो..!
'याचे करू आता काय मला सांग..' ची ' म'धनीरेंनीध गरेगरेसा..' ही संगती केवळ क्लास, त्यातलं कौतुक क्लास..! अगदी आपली वाटते ही संगती. वैशाली सामंतने छान गायलं आहे हे गाणं..
यमनासोबतच या गाण्यातली जलद लय मला फार आवडली.. पुढे छानसं यमनचं इंजिन आणि त्याला जोडलेले शब्दास्वरांचे रंगीबेरंगी डबे; अशी ती गाडी छोटी छोटी वळणं घेत मस्त चालली आहे असं वाटतं..
मन नितळ नितळ
नाही इतरासारखे
नाही मनामध्ये पाप मुखी राम राम..!
' मुखी राम राम..!'
आला..! शुद्ध मध्यम आला...!
' नाही मनामध्ये पाप मुखी राम राम..' या ओळीत शेवटी येणारा शुद्ध मध्यम केवळ अद्भूत..! शुद्ध मध्यमाबद्दल मी बापडा काय बोलणार..? मला अद्याप नीटसा कळलेलाच नाही हा स्वर..!
एकंदरीत खूप बरं वाटतं हे गाणं ऐकून, खूप प्रसन्न वाटतं..!
गाण्याचं चित्रिकरणही मस्त. आणि केतकी थत्ते..?
मला जर कुणी विचारलं की सार्या अंतराळात छान, सुंदर, सुरेख, झकास, फक्कड दिसणारी मुलगी कोण, तर मी क्षणात केतकी थत्ते हे उत्तर देईन..!
केतकी, जियो..!
-- तात्या अभ्यंकर.
तात्या मस्त लिहिता हो तुम्ही. गाणं अगदी डोळ्यांनी ऐकवता.
ReplyDeleteकधीतरी आशीर्वाद घ्यायला भेटायची इच्छा ठेवत आहे.
नक्की भेटूयात. पण मी एक सामान्य रसिक आहे. आशीर्वाद देण्याइतका मोठा नाही..
ReplyDeleteतात्या.
तात्या,
ReplyDeleteबहुदा तुम्ही पाहिलेही असेल... नसेल तर...
तीच वेळ आणि तेच गुरु लाभतील तुम्हांला... ऐका आमचे आणि सुरु करा अभ्यास...
पण कशाचा हे फक्त तुम्हांसच माहित आहे... आम्हांस नाही :-)
khup chhan. Khup mothhe samikshak aahat tumhi tatya..
ReplyDeleteUttam samikshak aahat tumhi tatya..Abhinandan..
ReplyDeleteThx Akshay. Thx all..
ReplyDelete--Tatyaa.