मैने तेरे लिये ही.. (येथे ऐका)
बाबूमोशाय अमिताभ, रमेश देव-सीमा, नोकर परंतु घरात एखाद्या वडीलधाऱ्यासारखा मान असणारा कुणी रामुकाका आणि राजेश खन्ना ऊर्फ आनंद सेहगल..
छान, सुंदर कौटुंबिक घरगुती वातावरण. असं घरगुती वातावरण तुमच्या-आमच्या घरातही अगदी सहज दिसू शकतं. आणि तुमच्या-आमच्या जीवनातल्या अशा साध्यासुध्या, आपुलकीच्या गोष्टी पडद्यावरही अगदी सहजसुंदरतेने दाखवणं हेच तर हृषिदांचं वैशिष्ट्य..!
आनंद सेहगल गाणं म्हणतो आहे - 'मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..'
छोटी बाते, छोटी छोटी बातों की है यादे बडी..!
ही खूप मोठी गोष्ट सांगतो आहे आनंद सेहगल. "बाबूमोशाय, जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहीये..! " -- असं म्हणणारा आनंद सेहगल. पण बाबूमोशायच्या चेहऱ्यावर कुठेतरी उदासी आहे. त्याला आनंदचं मरण स्पष्ट दिसतंय..!
दिल्लीहून उपचारांकरता मुंबईला आलेला आनंद सेहगल. आयुष्य भरभरून जगणारा, माणसांचा वेडा आनंद सेहगल. 'रोगाचं नाव असावं ते देखील कसं भारदस्त असावं..!', असं म्हणून आपल्याला Lymphosarcoma of the intestine झाला आहे असं सांगणारा आनंद सेहगल..!
मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको.. -- असं म्हणणारा आनंद..!
मुकेशचा हळवा, गोड गळा - सलीलदांचं संगीत, उत्तम कथा-पटकथा-अभिनय.. सारंच क्लासिक..
हृषिदा, तुम्ही प्लीज परत या हो.. तुमच्यासारखी माणसं सिनेजगताला कायमस्वरूपी हवी आहेत..!
"आनंद मरा नही, आनंद मरते नही..! "
हेच खरं..!
-- तात्या अभ्यंकर.
7 comments:
त्या चित्रावरचे जॉईंट सीन आणि हिरव्या त्रिकोणातील U পাহূন ইতরাংনা কায় বাটায়চে তে বাটূ দে, आम्ही खुष जाहलो-हल्लो, काही ऐकू येतेय ना? म्हणजे वाचलेले ऐकू आले की कान तृप्त होतात,,, गायलेले कोणीही ऐकू शकतो... हे स्तुत्य सत्य आहे...
"मुकेशचा हळवा, गोड गळा" ?? किशोरकुमार नाहि हा?
"मैने तेरे लिये ही..." is sung by Mukesh...
"मैने तेरे लिये ही..." is sung by Mukesh..
Great Director!!!!
Great Director!!!!
Great Director!!!!
Post a Comment