(येथे ऐका)
काही काही गाणी अशी असतात की ती केवळ ऐकायची आणि नकळत डोळ्याच्या कडा पुसायच्या! पं हृदयनाथ मंगेशकरांचं हे गाणं त्यापैकीच एक. अंतर्मूख करणारी चाल आणि संगीताच्या दुनीयेतली सारी बिरुदं जिथे संपतात, सारे स्वर, सार्या श्रुती जिथे हात जोडून उभ्या राहतात असा भारतरत्न लतादिदीचा स्वर!
अशी काय बरं पर्क्विझिटस् दिली होती महाराजांनी बाजीप्रभूंना? तगडं इयर्ली पॅकेज?, गाडी?, बंगला? तरीही तो महाकाय गडी त्या भयानक पावसाळ्या अंधार्या रात्री महाराजांना म्हणतो की 'राजे, आपण व्हा म्होरं, मी खिंड सांभाळतो!'
सगळंच अद्वितीय!
'पावनखिंडीत पाऊल रोवून,
शरीर पिंजे तो केले रण...!'
कुसुमाग्रज आपल्याला लाभले हे केवळ तुमचं-आमचंच नव्हे तर मायमराठी भाषेचं भाग्य!
--तात्या अभ्यंकर.