"तात्यासेठ, अभि ये महिनेमे मेरे बँकमे रख्खे हुए ३०००० रुपये मिलेंगे ना?"
"हा. क्यू नही मिलेंगे? जरूर मिलेंगे. डबल ढक्कनको बोल दुंगा!"
शबनम मला विचारत असते. तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे असतात, ती चाहेल तो खाऊ द्यायचा असतो, कपडे घ्यायचे असतात, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची असते.
शबनम..!
मी तसा कडमड्या हौशी गाणारा.. चार मित्रांनी जरा हरबर्याच्या झाडावर चढवायचा अवकाश, की लग्गेच मी नरडं साफ करायला घेतलंच म्हणून समजा! आता माझ्यासारख्या बेसुर्या, बेताल गवयाला काय गोविंदराव पटवर्धन साथीला मिळणार?! :)
त्यामुळे माझे बाजिंदे-साजिंदेही अगदी माझ्याचसारखे शिकाऊ. शकीलभाय पेटीवाला त्यातलाच एक. दोन तीन वर्षांपूर्वी बनारसी चाळीतल्या या शकीलभाय बाजेवाल्याने माझी आणि शबनमची ओळख करून दिली होती. काँग्रेस हाऊस आणि फोरासरोडवरच्या बनारसी चाळीत जिथे मुजरा होतो तिथे शकील भाय हार्मोनियम वाजवतो, चांगली वाजवतो. शकीलभाय हा शबनमचा मामू, की असाच कुणी सगेवाला.
"तात्याभाय, ये शबनम. इसको अच्छा पैसा मिलता है, अच्छा नाचती है. इसकू जरा तुम्हारा एल आय सी का पॉलिसी लेके देव!"
त्या दिवशी प्रथमच मी शबनमचा मुजरा पाहिला. छान दिसत होती, नाचतही छान होती. त्या बैठकीत दोनचार अय्याश लोक बसले होते, ते पैसे उडवत होते! ती मंडळी निघून गेल्यानंतर शबनमने माझ्याकरता आणि शकीलकरता चहा मागवला. मग एल आय सी पॉलिसी म्हणजे काय? विमा म्हणजे काय? कसे आणि किती वर्ष हप्ते भरावे लागतील, लाईफ-कव्हर म्हणजे काय?, इत्यादी सर्व सर्व गोष्टींवर मी तिचं भरपूर बौद्धिक घेतलं. समुपदेशनच म्हणा ना!
शबनम तशी अशिक्षितच. ज्या समाजात, ज्या वस्तीत, ज्या लोकात वाढली तो समाजही अशिक्षितच. तिला माझं बोलणं समजत होतं आणि नव्हतंही! शेवटी मी तिला त्या एरियाच्या, खास बंबिय्या-हिंदीत समजाऊन सांगितल्यावर तिला माझं म्हणणं पटलं असावं!
"देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश रंडीबाज तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?"
इतक्या कडक आणि हेटाळणीभरल्या शब्दात सुनावल्यावर शबनम भानावर आली. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं! त्यानंतर तिला मी विम्याच्या, पोस्टाच्या मासिक बचत योजनेच्या काही स्कीम्स समजावून सांगितल्या. आयूर्विमा महामंडळाची न्यू जनरक्षा पॉलिसी तिला दिली. डबल ढक्कनला सांगून मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेली रिकरींगच्या बचत योजनेत तिला पैसे गुंतवायला लावले. डबल ढक्कन हा प्राणी त्या बँकेचा दलाल आहे. हा इसम पूर्वी दिवसरात्र गांजा पिऊन फोरासरोडवर, फॉकलंडरोडवर पडलेला असायचा. मीच त्याला त्या बँकेचा दलाल बनवला. डबल ढक्कन तसा वल्ली माणूस. त्याचे व्यक्तिचित्र पुन्हा केव्हातरी!
दरम्यानच्या काळात विम्याच्या वगैरे कामानिमित्त माझी आणि शबनमची काही वेळा भेट झाली. एकदोन वेळेला मी तिला बाकायदा दिल्ली दरबार हाटेलात बिर्याणी खायलाही घेऊन गेलो आहे. 'हा माणूस मादरचोद नाही आणि याला आपल्यासोबत गेम वाजवण्यात काहीही इंटरेस्ट नाही!' असा कुठेतरी एक विश्वास, एक खात्री तिला होती/आहे! कारण ती ज्या दुनियेत वावरते त्या दुनियेत बाहेरच्या सभ्य, सुशिक्षित, पांढरपेशा समाजातले लोक तोंडं लपवून, कुठे काही चान्स मारायला मिळतो का, या एकाच हेतूने येतात. हो, तोंडं लपवून! घरच्या बायकोवर त्या मायझव्यांचं समाधान होत नाही. 'अमर प्रेम' मधली किशोरदाने गायलेली, 'हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!' ही ओळ मी तिथे येणार्या काही पांढरपेशा पब्लिकच्या बाबतीत अनुभवली आहे!
तर काय सांगत होतो?
आमची शब्बो तशी हुशार, व्यवहारचतूर परंतु अत्यंत अबोल. बोलेल तेही अगदी हळू आवाजात. स्वभावाने तशी खरच खूप चांगली आहे. पण नशीबाने तिला त्या बाजारात बसवली. तिची आई याच धंद्यातली. बनारसला कोठेवाली होती. काही वर्षांपूर्वी ती लहानग्या शबनमला घेऊन मुंबैत आली. शबनम १५-१६ वर्षाची झाली, जवानीत आली आणि आपसूकच या धंद्यात आली!
अहमदाबादचा पन्नाशीतला कुणी करोडपती जगनसेठ एकदा काँग्रेस हाऊस मध्ये मुजरा ऐकायला आला होता. सोळा-सतरा वर्षाच्या शब्बोरानीवर नजर गेली त्याची. पैसे उडवू लागला तिच्यावर. अडनिड्या वयातली शबनमही भाळली त्याच्यावर. आणि एकेदिवशी बाकायदा नथ-उतरणीचा कार्यक्रम ठरला. शबनमला चुरगाळण्याचे एक लाख रुपये ठरले. खुद्द तिच्या आईनेच सौदा ठरवला आणि पैसे घेतले. आता बोला..!
एकदा चव घेतल्यावर तो जगनसेठ येईनासा झाला! पन्नाशीतला जगनसेठ मुलीच्या वयाला शोभेल अश्या शबनमला भोगून दुसरीकडे हुंगेगिरी करायला चालता झाला! शबनमला दिवस राहिले. नथ-उतरणीच्या संबंधातून जर दिवस राहिले तर होणारं मुल फारच मुबारक! त्यातून मुलगी झाली तर फारच छान. कारण ती जवान होऊन पुढे घराणं चालवेल अशी मुजरेवाल्या/कोठेवाल्या दुनियेची धारणा!
शबनमला मुलगी झाली. जगनसेठने दिलेले पैसे संपले. शबनम पुन्हा कोठ्यावर हजर! आता तिची मुलगी मोठी होते आहे. आईचं म्हारातपण आहे, औषधपाणी आहे. जिंदगी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे..!
काहीच दिवसांपूर्वी शबनमच्या त्या 'मुबारक ' (?) औलादीचा जनमदिन होता म्हणून तिने मला जेवायला बोलावलं होतं. मटणकुर्मा-पराठे असा बेत होता. दोन पेगही झाले तिथे. तिची आईही होती तिथे. जनरली कुठल्याही वडिलधार्या माणसाला प्रथम भेटलं की वाकून नमस्कार करायची सवय आहे मला. परंतु मुलीच्या नथ-उतरणीचे लाख रुपये घेतलेल्या त्या बाईला बघितल्यावर नमस्कार तर सोडाच, उलट घृणा आली मला तिची! पण कुणाला दोष देणारा मी कोण? काय अधिकार मला? 'शबनमके मेहमान!' म्हणून त्या बाईने पाहिलं मला आणि लाचारपणे हसली. घृणेची जागा किवेने घेतली!
शबनमची पोरगी गोड आहे! कधी कधी विचार केला की वाटतं की त्या जगनसेठला का दोष द्यावा? त्याने सौदा केला होता, लाख रुपये मोजले होते! तरीही मनातल्या मनात त्या जगनसेठला शिव्याशाप देत मी त्या निष्पाप चिमुरडीच्या हातात शंभराची नोट ठेवली!
आता लौकरच शबनमचं डेली रिकरींग डिपॉझिट मॅच्युअर होणार आहे. तिला ३०००० रुपये मिळणार आहेत. मी तिला पुन्हा ते डिपॉझिट कंटीन्यू करायला सांगणार आहे. पण सध्या नाही. कारण तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे आहेत, ती चाहेल तो खाऊ घ्यायचा आहे, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची आहे!
करू देत..!
-- तात्या अभ्यंकर.