आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे...
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे...
संगीताच्या नावाखाली आज बराचसा सुरू असलेला थिल्लरपणा, उथळपणा, जाहिरातबाजी, रातोरात होणारे इंडियन, चायनीज, जॅपनीज आणि कुठलेकुठले आयडॉल्स, महागायक, महागायिका, महागुरु, रातोरात झालेले गौरव महाराष्ट्राचे...!
या सगळ्यांपासून दोन-पाच मिनिटं का होईना, थोडं दूर जायचं आहे? केवळ आणि केवळ तृप्ती आणि समाधान देणारं एक अतिशय साधं परंतु तितकंच सुरेख गाणं ऐकायचंय?
मग मधुकर जोशींनी लिहिलेलं, दशरथ पुजारींनी बांधलेलं आणि हळव्या स्वराच्या सुमनताईंनी गायलेलं हे गाणं कृपया ऐका..
गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तिरी या जळ संथ संथ वाहे..
कुठे २-४ गाणी धड नाही गायलीत तर लगेच दूरदर्शनद्वारा मिळणारी डोक्यात हवा जाणारी, संगीताला घातक असणारी अनाठायी, अवाजवी प्रसिद्धी..मग लगेच मोठमोठाले झगमगटाचे दिमाखदार संगीत सोहळे, ज्यांना गाण्यातला सा देखील माहीत नाही, परंतु नाट्यचित्रसृष्टीतले केवळ सेलिब्रिटी आहेत म्हणून, परंतु संगीताच्या दृष्टीने सर्वथा केवळ अपात्र असणार्या व्यक्तिंच्या कॉमेन्ट्स, त्यांची कवतिकं, आणि त्याच संगीतसंध्येच्या निमित्ताने त्यांच्या नवीन येणार्या एखाद्या चित्रपटाची जाहिरातबाजी किंवा प्रोमोज..!
संगीतसाधना करणार्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिंणींनो, दमलेल्या त्या वार्यासारखीच कदाचित तुमची अवस्था झाली असेल.. तेव्हा त्याच्याच प्रमाणे एखाद्या वेलीवर जरा सुखाने विसावा.. थोडं चिंतन-मनन करा.. केवळ आनि केवळ निखळ, निर्व्याज साधना कशी करता येईल याचा थोडा विचार करा इतकाच विनम्र सल्ला..!
भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काहि धुंद
त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे
सारं जग शांत निजलेलं आहे.. कुठलीही जाहिरातबाजी, गोंगाट न करता केवळ एक एकतारी घेऊन दोहे गाणार्या त्या कबीराकडून खूप शिकण्यासारखं आहे.. तो फक्त स्वत:च्या समाधानाकरता, स्वानंदाकरता गातो आहे, आणि म्हणूनच पर्यायाने तो त्या श्रीहरीकरता गातो आहे.. आणि त्यामुळेच त्याच्या स्वराला भक्तीचा सुगंध आहे..
सारं जग शांत निजलेलं असताना तो श्रीहरी मात्र त्याचं गाणं तल्लीनतेने ऐकतो आहे... वर म्हटल्याप्रमणे,
त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे..!
काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई
मला किती एस एम एस मिळतील?, मी जिंकेन का?, मग लगेच मला रातोरात एखाद्या अल्बममध्ये गाण्याचा चान्स मिळेल का?..

No comments:
Post a Comment