१५ पैशांना उत्तम लिंबू सरबत..
२० पैशांची ती काचेची जादू.. तिच्या मधोमध काच असे आणि चहुबाजूंनी प्राण्यांची चित्र असायची..समजा हत्ती यायला हवा असेल तर या बाजूने काचेवर आधी हत्तीचं चित्र पालथं घालायचं आणि मग काच गुंडाळायाची.. दुसरीकडून कागद उघडले की काचेआड तो हत्ती दिसायचा..!
आठवते का कुणाला ती काचेची जादू..? :)
१० -१५ पैशात लीचीवाला सांगेल त्या प्राण्याचे आकार करून द्यायचा..एका जाड लाकडी बांबूला गुंडाळलेली ती चिकट लीची..
१० पैशाला बुन्दिचा उत्तम लाडू मिळायचा.. वाण्याकडच्या काचेच्या बरणीत ते लाडू ठेवलेले असयाचे.. :)
१० पैशात सोरट खेचायचं.. समोर आमिष म्हणून बक्षिसांमध्ये एक आणि दोन रुपायाच्या करकरीत नोटा असायच्या.. पण सोरट मध्ये त्या नोटा कधीच कुणाला लागत नसत.. पण तेव्हा हे कळायचं नाही..
अहो..दहा पैशात जर कुणाला एक आणि दोन रुपायच बक्षिस लागलं असतं तर त्या बिचा-या सोरटवाल्याने काय खाल्लं असतं हे समजायला आयुष्याची चाळीस वर्ष जावी लागली..!
असो..
स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी..!
-- (मनाने अजूनही १९७० च्या दशकातच वावरणारा) तात्या..:)

3 comments:
खरेच ते सगळे जुने दिवस डोळ्यासमोर येतात, फारच सुंदर.
फारच सुंदर
फारच सुंदर
Post a Comment