राम राम मंडळी,
एका विद्वानाशी झालेल्या चर्चेचा काही भाग येथे देत आहे. वाचा आणि सोडून द्या हो!
उगाच जास्त टेन्शन घेऊ नका! ;)
विद्वानाचं म्हणणं लाल अक्षरात, आपलं च्यामारी निळ्या!
वर्णाश्रमात व्याख्या केलेल्या ब्राह्मणाने मग आता काय करावे ह्याबद्दल कोणी लिहीत नाही.
अहो मालक, कुणी काय करवं हे लिहिणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि मुळात तुमचा वर्णाश्रमच माझ्या मते फोल आहे.
वर्णाश्रमात व्याख्या केलेल्या ब्राह्मणाने मग आता काय करावे ह्याबद्दल कोणी लिहीत नाही. तो वर्ग (व्याख्येनुसार - रूढ अर्थानुसार नव्हे) आता लोप पावलेला आहे. आसारामबापू, मुरारीबापू, रमेशभाई ओझा, सुधांशु महाराज इ. इ. हे आता असणारे खरे ब्राह्मण.
खरे ब्राह्मण?? नाही, आपण म्हणता तर असतीलही हो ते खरे ब्राह्मण. पण आपण जी (ब्राह्मणांची!) चार नांवे लिहिली आहेत त्यापैकी दोन ब्राह्मण तर महाचालू आणि बाईलवेडे आहेत अशी खात्रीलायक बातमी मला आहे. मी नांवं कुणाचीच घेणार नाही. अर्थात असेनात का ते बाईलवेडे! अहो साक्षात तुमचा विश्वा जिथे मेनकेसमोर पाघळला तिथे इतरांचं काय? मेनका नाचायला लागल्यावर तुमच्या विश्वाने मनगटाला थुंकी लावत ध्यानधारणेला 'टाईमप्लीज' असं म्हटलंन आणि गेला फोकलिचा तिच्यामागे धावत.. ! :D
शूद्राची व्याख्या कशी करायची , आणि गवंडी (म्हणजे मिस्त्री नव्हे - मिस्त्री, सुतार, मेकॉनिक हे विशेष कला आवश्यक असणारे उद्योग आहेत, त्यासाठी काही वर्षेही घालवायवी लागतात ह्याची मला जाण आहे) वा पाट्या टाकणारे ह्यांना काय म्हणायचे ते सांगायची कोणी तसदी घेईल का ? का ते शूद्र नव्हेत आणि शास्त्रकारांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्यांना म्हटले तेही चूकच ?
अहो मालक, पण मला एक सांगा, मुळात कुणाची व्याख्या कराच कशाला? कुणाला काय म्हटलं पाहिजे आणि कुणाला काय नाही हा उद्योग पाहिजे कशाला? सगळी 'माणसं' आहेत एवढं पुरेसं नाही का?
का ते शूद्र नव्हेत आणि शास्त्रकारांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्यांना म्हटले तेही चूकच ?
अहो हे रांडेचे शास्त्रकारच तर सगळ्या आगी लावत आहेत. त्यांना नव्हता उद्योग, त्यामुळे बसले लिहीत लोकांना शहाणपणा शिकवत! शास्त्र सांगून वस्त्रात परसाकडला बसणारे ते शास्त्रकार!
कोण ब्राह्मण आहे, की क्षत्रिय आहे, की वैश्य आहे. की शूद्र आहे या गोष्टी कराच कशाला? कुणाचं काम काय, कुणाची व्याख्या काय करायची हे ठरवण्याचे अधिकार या शास्त्रकारांना जळ्ळे कुणी दिले?
असो, माझ्यापुरता हा चर्चाविषय मी थांबवत आहे.
मंडळी,
एकंदरीत अशी काहीशी झाली आमची चर्चा! नाही, माणूस तसा धर्मिक आणि विद्वानच हो. पण त्यांच्या विद्वत्तेची आमच्यासारख्या धर्मलंडांनी नोंद करायची ती कुठच्या खात्यावर?
असो...
चला मला आता मार्केटात जायचंय. चांगली सुरमई मिळते का ते बघतो. थोडीशी मांदेलीही घेईन म्हणतो. च्यामारी म्हावरं हल्ली लई महाग झालंय. सालं या कोळी लोकांच्यावर एकदा एखाद-दोन शास्त्रकारांना सोडले पाहिजेत. भीक नको पण धर्म आवर म्हणत सुतासारखे सरळ येतील! ;)
बराय तर मंडळी,
--तात्या.
12 comments:
तात्याजी नमस्कार,
आता चारपैकी दोन कोण तेही सांगितले असतेत तर बरे झाले असते. तसेच वाचस्पति अभ्यंकर व वारकरी सातारकर ह्यांबद्दलही काही (अशीच) माहिती असल्यास कळले तर बरे होईल. म्हणजे तशा चष्म्यातून पाहता येईल. ज्या शास्त्राला ज्ञानेशांनी, एकनाथांनी व रामदास स्वामींनी एवढे उचलून धरले तर मला वाटले त्यात काही तथ्य असेलही. आपले अनुभव वेगळे असतील. माझे अजून ऊन दुधाने ओठ पोळले नाहीत म्हणून ताक फुंकायची आठवण होत नाही. पोळतील त्यावेळी बहुधा मीही आपल्या इतकाच भडकलेला दिसेन. पण तो पर्यंत (मी माझ्या पुरते बोलतोय बरं का) रत्नाची जाण मला नाही म्हणून मी रत्नाचा रत्नपणा नाकारणार नाही. मतभेदही शेवटी आपापल्या अनुभवाच्या आधारावरच बनतात. पण त्याकरता वितुष्ट येण्याचे कारण आहे असे मला तरी वाटत नाही. (पटत नाही तिथे विद्वान हे संबोधन उपहासाने वापरतात असा माझा अनुभव आहे)
विश्वास भिडे -
तात्या,
ब्रह्मणांनी जरी जाती समतेची बाजू घेतली, व आपल्या पूर्वजांनी क्षुद्रांवर केलेला अन्याय मान्य केला, तरी आपण 'जुलुमी ब्रह्मण' आहोत याची आपल्याला सारखी जाणीव करून दिली जाते. नोव्हेंबर-डिसेंबर काळात दोन प्रसंग झाले - विदर्भ आणि कानपूर. The matter of 'casteism' was dragged into it for no reason. उच्च वर्गीय (so-called) लोकांचा यात काहीच् हात नव्हता हे पोलिसांनीच् सिद्ध केले. पण तरी 'ब्राह्मण वाईट' हा नारा 'जय भीम' बरोबरच् घेण्यात येतो. 'ब्राह्मणांचा सर्वनाश' हे त्यांचे ध्येय असूनही आपण सांमंजस्य दाखवत असतो, त्याचा हाच् का मोबदला?
- प्रियांक थत्ते
अरेरेरे तात्या,
ज्या तोंडाने श्रीदत्तात्रयाचे नाव घेतोस, त्याच तोंडाने शास्त्राचा विपरीत अर्थ काढून, आपलीच पाट थोपटून घेतोयस काय? विसोबा खेचर नाव घेतल की ‘पिंडी’ वर पाय ठेवण्याचा अधिकार मिळाला असे तुला वाटते की काय?
तात्या तूझी काळजी वाटते. आतातरी सुधर लेकाच्या. खाण्या-पिण्यापुढे सगळच, श्रीज्ञानदेवांच शास्त्र ही विटाळल जातय. त्याच्यापलिकडे बघ जरा, ३८ संपले, जागा हो.
>>ज्या तोंडाने श्रीदत्तात्रयाचे नाव घेतोस, त्याच तोंडाने शास्त्राचा विपरीत अर्थ काढून, आपलीच पाट थोपटून घेतोयस काय?
मुळात मी दत्तात्रयाचं नांव घेतो हे तुला कुणी संगितलं रे शिंच्या? आणि माझा ब्लॊग आहे, मी माझीच पाठ थोपटून घेईन नहीतर काय वाट्टील ते करीन. तू विचारणारा कोण?
>>विसोबा खेचर नाव घेतल की ‘पिंडी’ वर पाय ठेवण्याचा अधिकार मिळाला असे तुला वाटते की काय?
हो वाटतं! काय म्हणणं आहे? मी तुझ्या डोक्यावर सुद्धा पाय ठेवायला तयार आहे! ;)
>>तात्या तूझी काळजी वाटते.
त्याबद्दल मात्र मी खरंच तुझा आभारी आहे. अरे असं तुझ्यासारखं काळजी करणारं कुणी भेटलं की खूप बरं वाटतं बघ!
>>आतातरी सुधर लेकाच्या.
नाही रे. आता या जन्मात तरी ते शक्य होईल असं वाटत नाही. आणि सुधारायला मुळात मी बिघडलो आहे असं मला वाटत नाही! ;)
>>श्रीज्ञानदेवांच शास्त्र ही विटाळल जातय.
अरे बाबा का उगाच मोठ्या माणसांची नांव घेतो आहेस? आणि विटाळलं जाण्याइतकं माऊलीचं शास्त्र लहान नाही रे! खूप मोठं आहे ते. अगदी आभाळएवढं! जिथे तुमचे आमचे हात पोचूच शकत नाहीत! का उगाच गळे काढता रे माऊलीच्या नांवाने? आणि काय रे फोकलीच्या माऊलीच्या नांवाने एवढे गळे काढतोस ते तू स्वत: किती वेळा वाचली आहेस रे द्न्यानेश्वरी? हा तात्याचा नागडाउघडा ब्लॊग आहे. इथे तुझ्यासारख्या सभ्यतेची, संस्कृतीची आणि ढोंगीपणाची झूल पांघरणाऱ्याला मी असाच हाणणार! अरे जी माणसं खरोखरच सुसंस्कृत असतात ना ती उगाच इथे तात्याच्या ब्लॊगवर येत नाहीत. आणि आलीच तर त्याला तुझ्यासारखे फालतू रिप्लाय देत बसत नाहीत!
>> त्याच्यापलिकडे बघ जरा, ३८ संपले, जागा हो.
हो होतो बाबा जागा! तुला अगदी माझं वयही बरोब्बर माहिती आहे. बरीच माहिती बाळगतोस माझ्यासारख्या फालतू माणसाची! ;)
असो! माझ्या ब्लॊगवर येऊन माझं लेखन वाचून त्याला प्रतिसाद दिल्याबद्दल तुझे आभार! नांव लपवलं नसतंस जास्त बरं वाटलं असतं!
तुझा,
तात्या.
प्रिय तात्या,
शिंच्या, फ़ोकलीच्या, डोक्यावर पाय, नागडा-उघडा काय बोलतोहेस लेकाच्या! बर बाबा तूझाच पाय, ठेव माझ्या डोक्यावर. श्रीमाउली खरच माउली आहे रे! आणि तू पण फ़ालतू नक्कीच नाहीस,हे मला माहिती आहे रे!!
पण मला अस मनापासून वाटल की, तू इतक लिहितोस, पण त्यात श्रीमाउली असते तर मीच तूला डोक्यावर घेउन नाचलो असतो.तूझा हात लिहण्याकरता उठावा, तो श्रीमाउलीकरता,अस माझ भाबड मन म्हणत होत, म्हणून हा पत्रप्रपंच.
मी ढोंगी असेन, सुसंस्कृत नसेन, पण श्रीमाउली माझी आई आहे रे!
तुझाच,
ज्ञानाचा एका!
>>पण मला अस मनापासून वाटल की, तू इतक लिहितोस, पण त्यात श्रीमाउली असते तर मीच तूला डोक्यावर घेउन नाचलो असतो.तूझा हात लिहण्याकरता उठावा, तो श्रीमाउलीकरता,अस माझ भाबड मन म्हणत होत, म्हणून हा पत्रप्रपंच.
अरे बाबा तुझा मुद्दा लाख मोलाचा आहे रे! मला माऊलीकरता भरभरून लिहायला नक्कीच आवडेल. अरे पण तेवढा अभ्यास नको का माऊलीचा? अरे एक सबंध जन्म पुरत नाही रे माऊलीच्या अभ्यासाकरता! मी बापडा काय लिहिणर माऊलीवर? वो मेरे बस की बात नही.
आणि इतक्यात तरी त्या वाटेला जावं असं मला वाटत नाही! का वाटत नाही, याला उत्तर नाही! तसा योग यावा लागतो असं आपण वाटल्यास म्हणू! आणि तसा योग येण्याचं भाग्यही असावं लागतं! कुणी, "चला, आता आपण माऊलीवर लिहू" असं म्हणण्याइतका तो विषय सोपा नाही. तशी अनुभुती असावी लागते गाठीशी, मनाचे तसे संकेत मिळावे लागतात वारंवार! तरच एखादा माणूस द्न्यानेश्वरी हातात घेतो आणि अभ्यासू लागतो! एखाद्या sleveless ब्लाऊज घातलेल्या बाईच्या गोऱ्यापान दंडाकडे जोवर लक्ष जातं ना, तोवर माऊलीवर लिहिणं शक्य होत नाही! निदान माझ्याकरता तरी नाही!
आणि वर म्हटल्याप्रमाणे अनुभुती येण्याइतकी मनाची भक्तीची तेवढी सक्षम अवस्था यावी लागते! माझी ती कुवत नाही! 'भक्तिमार्ग' हा म्हटलं तर खूप सोपा आहे, आणि म्हटलं तर अत्यंत कठीण आहे. देवाचं नांव उच्चारणं खरं तर खूप सोप्पं आहे, पण ते उच्चारावंसं वाटणं हेच महामुश्कील आहे!
असो, आता फार पाल्हाळ लावत नाही. तू माझ्या ब्लॊगवर येतोस, वाचतोस, हे चांगलंच आहे. पण माझ्याकडून फार अपेक्षा बाळगू नकोस! मी जे जमेल ते, जे मनांत येईल ते लिहितो झालं! कुणाला आवडलं तर छान, नाही आवडलं तरीही छानच! ;)
तात्या.
तात्या,
मनाचा खेळ माहीत आहे तर तुला! अरे मनाच ऐकून कुणाच भल झालय?
देवाच नाव सुरुवातीला जबरदस्तीनेच घ्याव लागत लेकाच्या! मनाच ऐकत बसलास तर हे कसे होणार! नंतरची करामात हे नावच करत, आपल्याला आपणहून काही करायचच नसत.
वैखरीच नाम घेताघेता ते नाम परेत आपोआप जात. श्रीमाऊलींच नाव आदरान घेतोस ना, मग त्यांनी हरिपाठात दिलेल्या ग्वाही कडे असाकसा कानाडोळा करतो आहेस.अरे विषाची परि़क्षा घेऊ नये अस म्हणतात,पण अमृताची परिक्षा घ्यायला मूहुर्त कसला बघतो आहेस.
तात्या बस झाल रे रोजच तुझ तुणतुण, मला माहीत आहे रे श्रीज्ञानेश्वरी काय आहे ते. आपल्या करिता श्रीमाउलींनी एवढ लिहून ठेवलय, आपण असे कसे रे एवढे कपाळ करंटे की न काही करताच सगळ कळाव अशी अपेक्षा करतो. तात्या ‘अभ्यासाला दूष्कर’ काहीच नाही रे!
तुला काय वाटत, अगोदर सत्वगुणी होऊन नंतर देवाच नाव घ्यायच असत. अरे सगळे दुर्गुण असतात म्हणून तर आपण माणूस नाही का? श्रीहरीच नाम जबरदस्तीने घेतच सगळ्या संतानी कड गाठली.हे नाम घेतानाच दुर्गुण हळूहळू संपतात.
एक लक्षात ठेव, संतानी ‘परमार्थ’ हा करावा लागतो अस सांगितल आहे, तर प्रपंच प्रारब्धाधिन असतो अस ठासून सांगितल आहे. तुझा संत वचनावर विश्वास आहे म्हणून तूला सांगतो आहे की असा प्रारब्धावर चालणारा प्रपंच मीच करतोय अस समजून अजून किती दिवस कर्माच ओझ वाढवत बसणार आहेस? आणि जो ज्याचा त्यान करावा लागणारा असा ‘परमार्थ’ करण्यापासून अजून किती दिवस लांब पळणार आहेस? तू सूज्ञ आहेस अधिक काय सांगू?
बघ बाबा सांगायच काम मी केल.करन-नकरन तुझ्या हातात आहे.परत म्हणू नकोस की मला कुणी सांगितलच नाही.तात्या वेळ थोडाच आहे, गेलेला क्षण परत डोक आपटून घेतलस तरी परत येणार नाही.
ब्लोग तूझा,पाय तूझे, हात तुझे, तोंड तुझे… हो बाबा सगळ तूझच आहे, मी कुठ घेऊन पळून चाललोय. आता तूझे पाय माझ्या डोक्यावर ठेवायचे, की हातानी मला हाणायच, का तोंडान शिव्या घालायच्या हे तूच ठरवायच आहेस. माझ्या आवडी-नावडीच काय घेऊन बसलाहेस, मी सगळ्याच्या पलीकडे गेलोय अस समज हवतर!
तूझाच,

अरे हो रे बाबा! च्यामारी आता जास्त पीडू नकोस...;)
तात्या.
प्रिय तात्या,
तुला दुखावण , वा पिडण हा माझा उद्देश कधीच नव्हता! जर तुला तसे वाटले असल्यास मला क्षमा कर!
तुला एक विनम्र विनंती आहे.
भगवान वेदव्यास, श्रीमद भगवन आद्य शंकराचार्य, श्रीमाउली (श्री निवृत्तीनाथ, श्री सोपानदेव, श्री मुक्ताबाई), श्रीपरमहंस रामकृष्ण, श्रीसमर्थ रामदासस्वामी,
श्रीसंत जनार्दनस्वामी, विसोबा खेचर,नामदेव, एकनाथ,जनाबाई, प्रज्ञाच़क्षू गुलाबमहाराज, ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, शेगावचे गजानन महाराज, शिर्डिचे साईबाबा,पावसचे श्री स्वामीस्वरूपानंद, इ.
हे सर्व श्री दत्तात्रेयांच्या गुरुमंडलातलेच आहेत.
श्री वेद हेच शास्त्र आहे. मूळ झाड आहे.
तेव्हा शास्त्राची थट्टाकरताना, हेटाळणी करताना कृपया तारतम्य बाळगून केली पाहीजे.आपली प्रत्येक गोष्ट परत आपल्यापर्यंतच येउन थांबते, हे कायम लक्षात ठेवावे.
अंधश्रध्दा, चुकिच्या रुढी, परंपरा, यावर हल्ल जरूर करावा, पण मूळ शास्त्राकडॆ पहाताना , आपण अज्ञानी आहोत हे खुल्या मनाने मान्य करावे, व हे अज्ञान दूर करण्यासाठी आयुष्य खर्ची घालावे.
श्री माउलींनी पण शास्त्राला महत्त्व देउन, स्वत:चे आई-वडील गमावले असताना ही, पैठणला जाऊन, विधीवत मुंज करून घेतली.. यातील खोल आशय कधिहि विसरू नये.
गुरुवलयातले महासिध्द योगी, कायम कार्यरत असतात, हे त्रिकाल सत्य आहे. हे आपण अज्ञानाने उभ्या केलेल्या , आणि तोच खरा धर्म असा समजणार्या धर्मातीत, असे आहे.हे सर्व आजही आहेत, पण खेदाची गोष्ट म्हणजे आपल्याला ओळखता येत नाहीत, अगदी जवळून गेले तरी…..
चारही वर्ण, त्यात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, व शूद्र हे चार वर्ण.,प्रत्येक वर्णात परत चार पोट भेद आहेत, अशा हया सोळा पोटजाती व चांडाळादी इतर दोन, अशा अठरा पगड जाती शास्त्रांनी मानल्या आहेत.
हे प्रत्येकी चार-चार पोटभेद कळण्यासाठी एका वर्णा च उदाहरण घेउ,
वर्ण (कुळ) ब्राम्हण---
१) ब्राम्हण कुळात जन्मून जो ब्रम्हचिंतन करतो, तोच ब्राम्हण. ब्रम्हचिंतना मध्ये जो अष्टाध्यायी आहे, स्वशाखोपनिषत, श्रीभगवतगीता, विष्णूसहस्त्रनाम, देवांची षोडपचारे पूजा, त्यात पुरुषसूक्त, श्रीसूक्त,सौरसूक्त,रुद्र, पवमान,गणपति-अथर्वशीर्ष वै. शिवाय गायत्रीचा जप, कमीत-कमी तीन माळा जप, ब्रम्हयज्ञ, अशी कर्मे,तशाच उपासना, ज्ञान आणि शांती या गोष्टी अभिप्रेत आहेत.
२) ब्राम्हण कुलात जन्म घेऊन जो तलवार बहाद्दर झाला, शौर्य गाजवतो, गरिबांना मदत करतो,मात्र कोणाकडे कशाकरताही याचना करत नाही, तो क्षत्रिय,
३) ब्राम्हण कुळात जन्म घेऊन, ज्याला वेदविद्या येते, परंतू पोटासाठी जो त्या विद्येचा विक्रय करतो(भिक्षुकी), तो वैश्य,
४) आणि जे ब्राम्हण कुळात जन्माला येउनही जे,आचारी, वाढपी वै. इतर कामे करतात ते शूद्र.
असेच इतर वर्णात चार-चार पोट्भाग केल्यावर ल़क्षात येते की प्रत्येक वर्णात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे पोटभाग येतात. अशा ह्या १६ जाती आणि चांडाळादी २ जाती धरून मुख्य १८ पगड जाती होतात.
यात अजून अनंत पोटभाग आहेत, पण शास्त्र दृष्ट्या त्यात काही अर्थनाही, त्या केवळ रुढी आहेत.
महत्वाची गोष्ट म्हणजे, काम कोणतेही करत असूदे, देवळातला पुजारी, वेश्या, कत्तलखान्यातला खाटिक वा फ़ासावर चढवणारा चांडाळ ह्या सगळ्यांना परमार्थातला मोक्ष मिळवण्याची संधी सारखीच असते.
तुझाच,
ज्ञानाचा एका!
नमस्कार तात्या आपला blog आवडला, Please keep writing and share your valuable experience with us. :)
To Anonymous,
I dont know who are you, but i have some doubts, please clarify :)
१) शास्त्रामध्ये 'माणूस' नावाचा वर्ण आहे का?
२) आपण जे वर्ण सांगितले आहेत, त्यामध्ये 'IT/Software Engineer' कोणत्या वर्णामध्ये मोडतात?
३) समजा, ब्राह्मणाने पूजा सांगितली, क्षत्रियाने पूजेचे/होमाचे रक्षण केले, पण भिक्षुकाला आज काही भिक्षा मिळाली नाही, कारण ब्राह्मण पूजा सांगण्यात व्यस्त होते आणि क्षत्रिय रक्षण करण्यात.
क्षिधा नाही म्हणून शुद्र असे आचारी आणि वाढपी बसून राहिले, तर या condition मध्ये सगळे उपाशी राहणार का? कृपया सोदाहरण स्पष्ट करावे.
४) शास्त्रामध्ये लोकांना अरे-तुरे करायचेच असे सांगितले आहे का? आपण तात्यांना एकेरी ने संबोधता आहात म्हणून विचारला.
५) जर मी रोज देवाचे नाव घेतले, शास्त्र पठण केले तर माझ्या account मध्ये आपोआप १ तारखेला पगार जमा होईल का?
६) आपण एका reply मध्ये "मी सगळ्याच्या पलीकडे गेलोय अस समज हवतर!" असे म्हणता, पलीकडे म्हणजे नक्की कुठे?
७) परमार्थ म्हणजे काय? परमार्थ मध्ये blogging, chatting आणि लोकांना परमार्थाच्या नावाखाली शिव्या देणे, allowed आहे का?
कृपया मार्गदर्शन करावे,
आपला कृपाभिलाषी
निखिल (वय २६, एक माणूस, राहणार पुणे)
Post a Comment