December 21, 2010

भेट आभाळांची..!

नुकताच सचिनने टेस्ट मालिकेत ५० शतकांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. या अभूतपूर्व विक्रमाबद्दल सर्वप्रथम त्याचे मन:पूर्वक अभिनंदन..!त्याची डोळे दिपवून टाकणारी उत्तमोत्तम फटकेबाजी आम्हाला यापुढेही बघायला मिळावी हीच शुभकामना..

इथे मी काही सचिनच्या खेळाबद्दल भाष्य करणार नाही. मी सांगणार आहे एक आठवण.. खुद्द सचिननेच कुठल्याश्या दिवाळी अंकात सांगितलेली. तो कुठलासा मुलाखतवजा लेख होता एवढं नक्की आठवतंय. पण कुठला दिवाळी अंक हे आता आठवत नाही.. परंतु १९९५/९६चा सुमार असेल.. कारण अण्णा तेव्हा हवाईगंधर्व म्हणून कार्यरत होते!

ती आठवण अशी होती, की सचिन एकदा काही खाजगी कामाकरता मुंबैहून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून सचिनला म्हणाले,

"नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!"

त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की 'मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!'

मंडळी, 'गुणीजन जाने गुणकी बात' असं म्हणतात ते खरंच.. वास्तविक जेव्हा ही भेट झाली तेव्हा सचिनच्या ऐन भरारीचा तो काळ होता, सचिन घडत होता.. पण त्याला अभिवादन केलं ते एका सिद्ध पुरुषाने, एका योग्याने, एका स्वरभास्कराने! तेही आपल्या मानमरातबाचा, वयाचा, नावाचा कसलाही मोठेपणा न बाळगता! एक भारतरत्न, तर एक होऊ घातलेलं भारतरत्न!Smile



मंडळी, ही भेट खरंच दुर्मिळ.. ही भेट अनमोल.. ही भेट दोन आभाळांची, आभाळातच झालेली!

-- तात्या अभ्यंकर.

7 comments:

Athavale said...

In continuation, I may add an anecdote that I read sometime back.
Bhimsen Joshi and Sachin Tendulkar happened to stay in the same multistory building in Kolkatta, owned by a wealthy patron. On learning about Sachin's presence, Bhimsenji sent a message that he would like to go to his floor and meet him. Sachin, on hearing this message felt that he should, himself go Bhimsenji. Amongst other things,Bhimsenji inquired with Sachin about the prowess in cricket of his relative, Sunil Joshi.

Ravindra said...

नमस्कार तात्या!
मी आपला ब्लॉग गेले सहा सात महिने नियमित वाचतोय.
विषय कोणताही असु दे . आपण लिहिता अगदी सहजतेने.
"भेट आभाळांची..! " लिहून आपण अक्षरशः नक्षत्राचे देणे देवून टाकलेत.एकदा भेटायची इच्छा आहे.पाहू केंव्हा योग जुळतो ते.

रवींद्र said...

नमस्कार तात्या!
मी आपला ब्लॉग गेले सहा सात महिने नियमित वाचतोय.
विषय कोणताही असु दे . आपण लिहिता अगदी सहजतेने.
"भेट आभाळांची..! " लिहून आपण अक्षरशः नक्षत्राचे देणे देवून टाकलेत.
एकदा भेटायची इच्छा आहे. पाहू केंव्हा योग जुळतो ते.

Tatyaa.. said...

Thx to dear Ravindra & Athavale,

Tatyaa.

Niranjan said...

तात्या काय मस्त लिहिता...मी तुमची ही पोस्ट मात्र तुमच्याच नावानी शब्दांकितवर (http://www.orkut.co.in/Main#CommMsgPost?cmm=96985686&tid=5565604534148310266) पोस्ट केलेली आहे. मला वाटत तुमची हारकत नसावी. जर असेल तर मला pradhan.nc@gmail.com या मेलवर कळवा मी लगेच डिलिट करीन.

Niranjan said...

तात्या काय मस्त लिहिता...मी तुमची ही पोस्ट मात्र तुमच्याच नावानी शब्दांकितवर (http://www.orkut.co.in/Main#CommMsgPost?cmm=96985686&tid=5565604534148310266) पोस्ट केलेली आहे. मला वाटत तुमची हारकत नसावी. जर असेल तर मला pradhan.nc@gmail.com या मेलवर कळवा मी लगेच डिलिट करीन.

Tatyaa.. said...

No probs Sir..

Tatyaa.