पुरिया रागाचा स्वभाव आणि आमच्या भीमण्णांचा स्वभाव यात नेहमीच मला एक साम्य दिसत आलेलं आहे..
धीरगंभीर, टक्केटोणपे खाल्लेला, अनुभवी असा एक बुजुर्ग पुरिया..
जो मूलत: अबोल आहे.. सततचं फक्त आत्मचिंतन.. आणि त्यायोगे स्वत:मधल्या आत्मिक शक्तिचा सतत विकास..!
पुरिया.. एक तेजस्वी योगी.. जो चाललाय आपल्याच वाटेने.. आपलीच वाट शोधत...
चेहेर्यावर एक आश्वासक परंतु घनगंभीर भाव.. एक निर्भयता...
उगीच कुठे हॅ हॅ नाही.. की हू हू नाही..
काही गहन प्रश्न विचारावा.. आणि अगदी मोजक्याच शब्दात परफेक्ट उत्तर यावं असा पुरिया.. उगीच कुठे भारंभार चर्चा नाहीत की परिसंवाद नाहीत...!
अण्णाच एकदा म्हणाले होते,
मी आणि माझं संगीत.. आम्ही प्रवासी आहोत.. अनोळखी वाटेवरचे..! आकाशाची उंची, सागराची खोली उगाच कशाला तपासून पाहा..?
अण्णा.. आणि अण्णांचा पुरिया...!
एक अद्वैत..!
अण्णा.. आणि अण्णांचा पुरिया...!
माझ्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा..
सावल्या लांबतील... तिन्ही सांजा होतील... तंबोरे लागतील... आणि कोमल रिखबाला अगदी हलका स्पर्श करून अण्णा शुद्ध निषादावर कृपा करतील आणि त्याच्यावर विसावतील..
ज्यावरून तानपुर्यातला निषाद जुळवावा.. असा तेजस्वी निषाद..!
आणि पुरियाची व्रतस्थ वाट सुरू होईल...!
-- तात्या अभ्यंकर..

No comments:
Post a Comment