हल्ली निदान पुण्या-मुंबईच्या तरी लग्नामुंजीत पंगतीची पद्धत गेली ती गेलीच..निदान मला तरी शेवटचा पंगतीत केव्हा जेवलो होतो ते आठवत नाही..
सगळीकडे जळले ते बुफे असतात. त्यामुळे जेवणही आता तितकंस छान मिळेनासं झालं आहे. कारण बुफेत डाळ, पुलाव, दोन पंजाबी भाज्या, एखादे बेचव पक्वान्न असा ठराविकच मेनू असतो..
व्यवस्थित सुरवातीचा वरणभात, मसालेभात, बटाट्याची छान पिवळी धमक भाजी, पंचामृत, खिरीचा चमचा, थोडं पुरण, तोंडल्याची रसभाजी किंवा अळूची लग्नी भाजी.. असा व्यवस्थित स्वयंपाक हल्ली दुरापास्त झाला आहे..
हल्ली बुफेमध्ये अंगूर मलाई, मुगाचा हलवा अशी तीच तीच बेचव पक्वान्न असतात..गुलाबजाम असले तरी ते पारंपारिक पद्धतीचे नसतात..gits type बेचव असतात..
झकास जिलब्यांचे ताट घेउन किंवा श्रीखंडाचं पातेलं घेउन कुणी जोरदार वाढायला येत नाही..यजमान मंडळी सावकाश जेवा असं सांगत पंगतीतून फिरत नाहीत...
लाचारासारखं हातात थाळी घेउन लायनीत उभं रहायचं.. आणि अन्नछत्रात जेवल्यासारखं जेवायचं.. छ्या..!
सुरवाती सुरवातीला बरी वाटलेली ती बुफेची पद्धत आता एक बांडगूळ झाली असून तिने पंगतीची परंपरा गिळून टाकली आहे..
म्हणून आत्ताच सावध व्हा.. आपल्या परंपरा जपा रे बाबानो...
-- (खिन्न) तात्या..

2 comments:
AAjkla maharashtratil sarva mothya shaharat catering cha business rajasthani lokanchya hatat aahe. Tyamule sagly thikani rajstani padhadatiche jevan tayar kele jat.
Jar kuni UP / delhi side cha asel tar to nonveg khanar asel tar Punjabi la preference deto.
हल्ली लोकांना पंजाबी आणि चायनीज भरपूर आवडते. लोकांच्या आवडी निवडी बदलल्या आहेत. त्याचाच हा परिणाम असावा. यात शिकलेले किवा कमी शिकलेले असेही काही नाहीये. जास्त शिकलेल्या लोकांच्या लग्नात देखील अशीच हलत असते
Post a Comment