June 19, 2007

चर्चा एका उपक्रमीशी!

मिलिंद भांडारकर या आमच्या मित्राशी केलेल्या चर्चेचा हा काही भाग.

मूळ संदर्भ - 1) http://mr.upakram.org/node/423#comment-5762
2) http://mr.upakram.org/node/423#comment-5772

मिलिंदचं म्हणणं लाल अक्षरात, आपलं तिच्यायला निळ्या!


>>सहा महिने वाट पाहणार होतात ना ?

कशाला वाट पाहायची? एका साध्या प्रश्नाचं 'हो' किंवा 'नाही' एवढंदेखील उत्तर जर उपक्रमरावाला आणि त्याच्या टीमला देता येत नसेल आणि ही लोकं (की तुम्ही लोकं? कारण उपक्रमबद्दल तू उपक्रमरावाशी चर्चाबिर्चा करतोस म्हणे!) जर मला अनुल्लेखानी मारणार असतील तर इथे राहण्यात काय मतलब आहे??
बरं जाहीर उत्तर नाही तर नाही, पण उपक्रमला 'या विषयावर लिहा' किंवा 'लिहू नका' या आशयाची एखादी खरड किंवा व्य नि तरी मला टाकता नसता आला? उपक्रमाच्या सुरवातीला हगल्यापादल्या कुणाच्याही शंकांना त्वरेने उत्तरे देणारे उपक्रमराव आत्ताच एवढे गप्प का बसले आहेत? पण मिलिंद, एका संकेतस्थळाचे आपण मालक झालो याच गुर्मीवर ही मंडळी वावरत आहेत. एवढी कसली गुर्मी यांना चढली आहे तेच कळत नाही!


बारबालांचा विषय अनायसे निघालाच होता म्हणून मी हा प्रश्न विचारला होता. वास्तविक असा प्रश्नदेखील मी विचारला नसता पण माझा 'रौशनी' हा सामाजिक आशय असलेला लेख मी सर्वप्रथम उपक्रमावरच टाकला होता, पण तो लेख इथून एका मिनिटात उडवला होता हे तुलाही माहित्ये आणि त्यावर तुझ्याकडेही काहीही उत्तर नव्हतं हे तू मला व्य नि ने कळवलं होतंस. यावेळेस पुन्हा असं होऊ नये म्हणूनच मी जाहीर सवाल विचारला होता यात काय चुकलं माझं?

'बारबाला' या विषयावर माझ्याकडे लिहिण्यासारखं खूप आहे. मी येथील काही प्रतिसाद वाचले पण ती फार वरवरची माहिती आहे. वस्तुस्थिती काय आहे, यात हॉटेलमालक काय राजकारण खेळतात, यासर्व गोष्टी मी खूप जवळून पाहिल्या आहेत. पण उपक्रमाला बहुधा संगीत, व्याकरण, हा शब्द कसा आला अन् त्या शब्दाची व्युत्पत्ती काय, अन् महाभारतात व्यासाने काय लिहून ठेवलंय, गणिती कोडी, संगणकशास्त्र इतपतच सगळे गुडीगुडी, छान छान चार भिंतितले, वरणभातवाले सोवळे विषय पचतात असे दिसते! वेश्याव्यवसाय, बारबाला, दोन नंबरचे धंदेवाले, दारुवाले यांच्याविषयीच्या लेखनाच्या नुसत्या कल्पनेने बहुतेक उपक्रमरावाला आणि त्याच्या टीमला घाम फुटत असावा! तर ते पचवणार काय??

असो, उपक्रम हे माजघरातच ओव्या म्हणत रमणारं संकेतस्थळ दिसतं आहे. तिथे सगळी दुनियादारी केलेल्या आमच्यासारख्या भिकारचोट माणसाचे काय काम? ;)

आम्ही मिसळ, आमरस, मटण हे सगळे पदार्थ खाल्लेली माणसं! उपक्रमला फक्त मऊभात तूप मेतकुटी घरगुती माजघरातले माहितीपूर्ण लेख लिहिणारी मंडळी हवी आहेत! आम्ही कुमार, बाबुजी, भीमसेनही जवळून बघितले आणि वेश्या, दारुवाले आणि दोन नंबरचे धंदेवालेही तेवढ्याच जवळून बघितले!

असो, 'तुम्हा' उपक्रमी संपादक मंडळींना 'तुमचं' उपक्रम लखलाभ! एरवी जाहीरपणे १०० प्रतिसाद देणारा तूही उपक्रमरावाच्या जवळचा असल्यामुळे मूग गिळून आहेस हे पाहून मात्र गंमत वाटली! ;) असो! कुणाचा इंटरेस्ट कशात तर कुणाचा इंटरेस्ट कशात!

असो! आपण आहे नंबर एकचा वेडझवा माणूस. तो 'तुमच्या' उपक्रमापासून दूर राहिलेलाच बरा! 'तुला', 'तुझ्या उपक्रमी टीमला', आणि 'तुझ्या उपक्रमला' माझ्या मनपासून शुभेच्छा! खूप खूप मोठे व्हा आणि मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत पहिलं बक्षिस वगैरे मिळवा! ;)

मला मात्र तुझ्या उपक्रमात इटरेस्ट होताही आणि नव्हताही! एक तात्या गेला तर उपक्रमाचं काहीच बिघडणार नाही आणि एक उपक्रम गेलं तर तात्याचंही काहीच बिघडणार नाही! तात्या क्या है, कैसा है ये सब जानते है!

जोपर्यंत इथे होतो तोपर्यंत इथे बरंच काही संगीतविषयक लिहायचा विचार होता. 'मला आवडलेले भीमसेन' अशी अण्णांच्या ध्वनिमुद्रिकांवर आधारीत लेखमाला त्यातील सौंदर्यस्थळे तुकड्यांच्या रुपाने एखाद्या संकेतस्थळावर ऐकता येतील अशी चढवून त्याबाबत इथे विस्तृत लिहायचं कालच माझ्या मनात आलं होतं. पण भोसडीच्यांनो तुम्ही लोकांनी हा गेम केलात! ;)

चलो कोई बात नही! आता फिरत फिरत असेच कुठले दुसरे संकेतस्थळ दृष्टीस पडले आणि पुन्हा मूड आला तर तिथे लिहीन! आपल्याला काय! जिथे मन रमेल तिथे काही काळ थांबेन. नाहीतर एकला चलो रे आहेच!


>>तात्या, रविवारी रात्री प्रतिसाद टाकून सोमवारी सकाळी उत्तराची अपेक्षा का करतोस बाबा ? जरा धीर धर.

का बरं? एरवी तो फोकलीचा उपसंपादक तर बघावं तेव्हा पोलिसगिरी करत फिरत असतो की! बरं, सोमवार सकाळ तर केव्हाच गेली. आज मंगळवार सकाळ उजाडली आहे. अद्याप कुणाचंही उत्तर नाही!

>>दुसरे, रौशनी आणि बारबालांवरचा तुझा आगामी लेख, ह्यात फरक असेल की नाही ?

फरक आहेही आणि नाहीही. दोन्ही विषय स्त्रीशी निगडित आहेत. नैतिक अनैतिकतेच्या व्याख्येत बसणारे आहेत. तेव्हा विशेष असा फरक नाही. म्हणून म्हटलं आधी विचारून घ्यावं!

>>तिसरे, तुला एकट्याला अपवाद करण्याचा वेगळा पायंडा पाडणे हिताचे आहे का ?

अपवाद करा असं कुठे म्हटलंय मी? मी फक्त सदर लेख टाकू किंवा नको इतकंच विचारलं होतं ना? त्याचंही उत्तर देणं तुम्हाला जड झालंय?? एखाद्या सभासदाच्या जाहीर प्रश्नाला जाहीरपणे नाहीतर नाही पण खरड किंवा व्य नि लिहूनही दोन ओळींचं उत्तर देता येऊ नये? का बुवा असं? एवढा कुठला माज? एवढी कुठली गुर्मी?? उपक्रमाचे मालक आहात याची??

की तात्याला जे काय असेल ते जिंदादिलीने जाहीर उत्तर देतांना तुमचा सोकॉल्ड ईगो दुखावला जाईल अशी तुम्हाला भिती आहे? की अश्या नाजूक विषयावर तात्याने स्वतःहून लिहिलं तर लिहू दे, पण त्याकरता त्याला मुद्दामून परवानगी कशी काय द्यायची अशी तुमची पंचाईत झाली आहे? ;)

की या विषयाला परवानगी देऊन उपक्रमरावाच्या माजघरी परिटघडीच्या कपड्याला आणि सोकॉल्ड नैतिकतेच्या भंपक कल्पनांच्या इस्त्रीला सुरकुती पडेल की काय अशी बहुधा उपक्रमरावाला भिती पडली असावी! ;)

किती रे लहान मनोवृत्तीची माणसं आहात तुम्ही? अरे मिलिंद तू वसंतरावांचा भक्त ना? आठवून बघ एकदा वृत्तीने किती उमदा मनुष्य होता तो!

जाऊ दे मिलिंद. तुम्ही जपा तुमचे ईगो आणि तुमची माजघरातली ध्येयधोरणं. आपण साला आहे नागडा तमासगीर माणूस. तुमचं आमचं नाय जमणार!

असो! माझ्याकडून हा विषयही संपला आणि उपक्रमही संपलं. मी माझे येथील सर्व लेख उडवून टाकायला सांगितले आहेत आणि माझं खातंही बंद करायला सांगितलं आहे. ते अद्याप का केलें नाही हेदेखील कळलं नाही. असो, इथे अधुनमधून नक्की येत राहीन. आणि माहिती व देवाणघेवणीच्या माजघरातील तुमच्या सभ्य परिटघडीच्या चर्चा वाचत जाईन! ;)

तात्या.


6 comments:

MilindB said...

तात्या,
तुझ्या लोकप्रिय अनुदिनीवर माझा उल्लेख केल्याबद्दल शतश: धन्यवाद. तुझ्या वाचकांना माझा परिचय असेलच, किंवा नसल्यास होईल. माझ्या उत्तराची वाट पाहाण्यासाठी जरा धीर धरला असता, तर अधिक आवडले असते, पण कोई गल नही. मी तुझ्या उपक्रमाच्या खरडवहीवर उत्तर लिहिले आहे. ते वाच, आणि मग बोलू.
- मिलिंद

Yogesh said...

तात्या तुम्ही ब्लॉगवर लिहा. आम्ही आहोतच वाचायला आणि प्रतिक्रिया द्यायला.

इथं मारामारी करु. ;)

MilindB said...

एक खंत आहे फक्त. माझा उल्लेख "एकेकाळीचा मित्र" असा केलेला आवडले नाही. पुन्हा विचार करून ही चूक वाटल्यास दुरुस्त करशील का?
- मिलिंद

A woman from India said...

तात्या,
तुम्ही मांडलेली व्यथा ही एकाट दुकाट संकेतस्थळाला लागू पडत नाही, तर अख्ख्या मराठी विश्वालाच लागू पडते.
समाजाच्या विविध स्तरांमधे तुम्हाला आलेले अनुभव हे फार महत्वाचे आहेत. त्याच्या नोंदी होणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या ब्लॉगवर जे हवे ते लिहा, पण इतरांकडून फार प्रतिसादाची अपेक्षा केल्यास भ्रमनिरास होण्याचीच शक्यता आहे.
बहुतेक वाचकांना काही तरी हलकं-फुलकं वाचायला हवं असतं. "आज मला काय लिहावे ते सुचत नाही, निळसर कंटाळा दाटून आला आहे" असे लिहिले तर ब्लॉगवर २० एक प्रतिक्रिया तरी सहज मिळतील.
असे असले तरी परिस्थिती सुधारते आहे असे ही मला वाटते. काहीतरी वेगळे लिहिणार्‍यांनी निराश नं होता लिहित रहावे.

Anonymous said...

तात्या चूक तुझीच आहे! तुझ्या बारबाला नाचवायला तुला माजघरच सापडलं का? त्या वरणभात वाल्यांची पारच करून टाकलीस की!!..

त्यांना त्यांच्या ओव्या गाऊ दे.. तु तुझा डान्सबार चालू ठेव! आणि हो त्या सर्किटापासून जरा जपून हो.

bhaskarkende said...

कोकणी तात्या, कसं व्हायचं हो आपलं? कुठे म्हणून च्यायला कोकण्या स्वभावला तिळभर सोडणार नाही. असू द्यात. आम्ही आहोत ना तुमचे लेख वाचायला. अनुदिनीवर लिहा आम्ही वाचत राहू.

स-स्नेह,
भास्कर केन्डे
bhaaskarkende.blogspot.com