II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मडळी,
ठाण्यातील 'संस्कृत स्थानम्' या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणार्या संस्थेने रविवार दि १५ जुलै, २००७ रोजी संध्याकाळी ८.३० वाजता कालिदास दिनाचा मुहूर्त साधून 'आषाढस्य प्रथम दिवसे' हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
महाकवी कालिदासाच्या 'मेघदूत' या साहित्यकृतीवर आधारित हा कार्यक्रम असून त्या अंतर्गत मेघदुतातील काही श्लोकांचे निरुपण आणि गायन होणार आहे. तसेच नृत्यातील काही भावमुद्रांचेही सादरीकरण होणार आहे. याबद्दलची अधिक माहिती खालीलप्रमाणे -
आषाढस्य प्रथम दिवसे..
१) मेघदुतातील काही निवडक श्लोकांचे निरुपण - संस्कृत विदुषी सौ धनश्री लेले.
२) गायन - अभिजात संगीत गायिका सौ वरदा गोडबोले।
३) श्लोकानुरुप भरतनाट्यममधील भावमुद्रा - नृत्यांगना निलिमा कढे
४) संगीत - तात्या अभ्यंकर
५) निर्मितीप्रमुख - तात्या अभ्यंकर.
कार्यक्रम स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे.
दिनांक व वेळ - १५ जुलै २००७, रात्रौ ८।३० वा.
प्रायोजक - पितांबरी प्रॉडक्टस प्रा लि
प्रवेश विनामूल्य...
सर्व इच्छुकांनी सदर कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.
कालिदसमहाराजांच्या ओळींना हिंदुस्थानी रागसंगीतावर आधारित स्वरसाज चढवायला मिळाला, ही मी माझ्या भाग्याची गोष्ट समजतो.
धन्यवाद!
आपला,
तात्या अभ्यंकर,
प्रसारक व प्रचारक,
हिंदुस्थानी रागदारी संगीत.
6 comments:
अभिनंदन तात्या !
तात्यासाहेब,
इथे इतक्या दूर असल्यामुळे हजर रहाणे अशक्य आहे. हिंदुस्थानात असतो तर जरूर आलो असतो.
कार्यक्रम सुरेख होईल यात शंका नाहींच. पण केवळ ’वडीलकी’च्या नात्याने भरपूर शुभेच्छा मात्र देतो.
कार्यक्रम झाल्यानंतर त्याबद्दलचा वृत्तांत जरूर पोस्ट करावा ही विनंती.
लगे रहो, तात्यासाहेब!
सुधीर काळे
तात्यासाहेब,
इथे इतक्या दूर असल्यामुळे हजर रहाणे अशक्य आहे. हिंदुस्थानात असतो तर जरूर आलो असतो.
कार्यक्रम सुरेख होईल यात शंका नाहींच. पण केवळ ’वडीलकी’च्या नात्याने भरपूर शुभेच्छा मात्र देतो.
कार्यक्रम झाल्यानंतर त्याबद्दलचा वृत्तांत जरूर पोस्ट करावा ही विनंती.
लगे रहो, तात्यासाहेब!
सुधीर काळे
तात्या पुन्हा एकदा शुभेच्छा... तुम्ही नंतर त्याचा वृत्तांत नक्की द्या. :)
Amhi nakki yenar!
तात्या (खरं नाव काय आहे माहित नाही) साहेब नमस्कार,
मी आपल्या अनुदिनी वर पोहोचलो (वाया मराठी ब्लॉग्स.नेट), आपले लेखन मला खूप आवड़ले, आपले "तत्व" सुद्धा... पण मला शंका आहे कि आपल्या "प्रोफ़ाइल" मधे दिलेले "वय ३८" हे खरे आहे कि नाही? तात्या अभ्यंकर हे नाव तरी खरेखुरे आहे कि नाही? आणि बरेच काही.. अर्थात ह्याचा आपल्या उत्कृष्ट लेखनाशी काही पण सम्बन्ध नाही, पण सहज उत्सुकता म्हणून... जन्मापासून मध्यप्रदेशात राहिल्यामुळे मला मराठी लिहीणे काही जास्त जमत नाही, पण वाचनाची मात्र आवड़ आहे... एकदा पुन्हा आपल्या लेखनाबद्दल अभिनन्दन..
Post a Comment