November 12, 2008

प्रभात राग रंगती...

भल्या पहाटे 'ललत'
षड्ज मध्यमी मूर्च्छना
चालली 'भटियारा'ची
प्रभातरंगी अर्चना

डमडम डमरूची
आली 'भैरवा'ची स्वारी
तीव्र मध्यम वाढवी
'रामकली'ची खुमारी

कारुण्यमय 'तोडी'ची
'आसावरी'शी संगती
'अहिरभैरवा' संगे
प्रभात राग रंगती..!

-- तात्या अभ्यंकर.

हीच कविता इथेही वाचता येईल..

1 comment:

Anonymous said...

मी प्रथमच तुमचा ब्लॉग वाचला . मला फार आवडला. रोशनी बद्दल माहिती व आजुबाजुची माहिती वाचून खुपच वाईट वाटले. पुढील भाग जरुर लिहा कृष्णासाठी जरुर नोकरी बघा.
संगीता कुलकर्णी