February 17, 2015

एक जळणारी चिता..

आज मी एक
चिता जळताना बघितली..

त्यात जळत होतं
आबांचं पार्थिव..

पण त्यात फक्त आबांचं पार्थिवच जळत होतं का..?

नाही..

त्या पार्थिवासोबत जळत होती
ती सादगी आणि तो साधेपणा..!

सादगी आणि साधेपणा..
ज्याची मुळातच आज वानवा आहे..

तिची अशी राख होणं
मला बघवलं नाही..

तिची अशी राख होणं
आपल्याला परवडणारं नाही..!

-- तात्या अभ्यंकर..

1 comment:

Abhishek said...

ज्योतीपासून प्रेरणेच्या प्रवासासाठी तेलाला जळावं लागत...