June 11, 2010

एक निवेदन...मी सुरू केलेल्या मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळावर आजपर्यंत मुखपृष्ठाची जिम्मेदारी मी माझ्या कुवतीनुसार जे सुचेल, जे रुचेल ते लिहून सांभाळली.. इतकेच नव्हे तर मराठी संस्थळांच्या इतिहासात रोज निराळे मुखपृष्ठ व खादाडी सदर याचीही कल्पना राबविली व ती सर्वप्रथम मिपावरच सुरू केली..


परंतु या पुढे काही व्यक्तिगत कारणांमुळे मिपाचे मुखपृष्ठ व 'खादाडी सदर' ही जिम्मेदारी मला निभावता येणार नाही असे नमूद करू इच्छितो..


आजपर्यंत मिपावर सादर केलेल्या निरनिराळ्या मुखपृष्ठांबाबत अनेकांनी ती आवडल्याचे कळवले व कौतुकही केले. त्या सर्वांचा मी ऋणी आहे..


त्याचप्रमाणे मिपावर आजवर सादर केलेली मुखपृष्ठे ही या माझ्या ब्लॉगवर तसेच मनोगत डॉट कॉम या संस्थळावर 'काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे' या सदराअंतर्गत वाचायला मिळतील..


मिपाला अनेक शुभेच्छा..


धन्यवाद,


--तात्या.

No comments: