March 29, 2011

मोहाली उपान्त्य सामना आणि मनमोहन सरकारची लाचारी...!


चेंडुफळीच्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक हा सामना उद्या मोहालीत होणार आहे त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. दोन्हीही संघ आयसीसीचे सभासद असल्यामुळे व हा सामना विश्वचषकातीलच एक असल्यामुळे त्याला आमचा विरोध नाही व तो करण्याचे काही कारणही नाही. आमचा मुद्दा वेगळाच आहे.
भारतासारख्या सार्वभौम देशाच्या पंतप्रधानांनी पाकच्या राष्ट्रप्रमुखांना हा सामना पाहण्याकरता मोहालीत येण्याचे जे प्रेमाने आणि उमाळ्याने आमंत्रण दिले आहे त्याबद्दल आम्ही अतीतीव्र शब्दात आमचा निषेध नोंदवतो. आमच्या मते भारतीय पंतप्रधानांचे हे अत्यंत लाचारीचे वर्तन आहे.
भारताच्या या निमंत्रणावर पाकने म्हणे अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारताची हद्द ओलांडून चुकून पाकिस्तानात घुसलेल्या गोपालदास नामक (चूभूदेघे) एक इसमाला पाकने त्यांच्या कैदेतून तात्काळ मुक्त केले आहे...!
यावर आम्ही भोळसट भारतीयांनी खुश व्हावे आणि मनमोहन सरकारची पाठ थोपटावी अशी सरकारची अपेक्षा आहे काय..?
सकारात्मकच जर प्रतिसाद द्यायचा असेल तर मग पाकने कसाबबद्दलची सगळी माहिती तात्काळ का नाही उपलब्ध करून दिली..? खंडणीची दहशत, गँगवॉर या सारखी कारस्थाने करून गेली अनेक वर्षे डोकेदुखी ठरलेल्या व सध्या पाकिस्तानात लपलेल्या दाऊद इब्राहिमला रातोरात भारताच्या हवाली का नाही केले..?
आम्ही असा अजून किती काळ लाचारीच्या मित्रत्वाचा हात पाकपुढे पसरणार आहोत? आणि का? कशासाठी..?
पाकच्या पंतप्रधानांना मोहालीत मारे प्रेमाचे आणि मैत्रीचे आमंत्रण देणारे पंतप्रधान मनमोहनसिंग मुंबै हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या संदीप उन्नीकृष्णनच्या घरी सांत्वनासाठी कधी गेले होते का हो..?
मुंबै सी एस टी स्थानकात, गेटवेला रक्ताची होळी खेळणार्‍या पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांपुढे ही लाचारी का..?
परंतु ज्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती एका इटालीयन मूळ असलेल्या स्त्रीकडून लीलया ठरवले जातात, स्थापित केले जातात त्या देशाला स्वाभिमान तरी का असावा..?
असो..
-- तात्या अभ्यंकर.
--
आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे
रिपुदमनाचा आईभवानी आम्हाला वर दे..!
(चित्रपट २२ जून १८९७)

3 comments:

THANTHANPAL said...

प्रधानमंत्री यूसुफ रजा गिलानी के भारत-पाक सेमीफाइनल मैच देखने जाने से पहले सजा माफी का ऐलान सद्भावना के तौर पर उठाया गया कदम माना जा रहा है। .... इस सदभावानसे..... भारत के पंत प्रधान सदगतित हुवे और उन्होंने पाक के आंतकवादी कसाब को फासी के बजाय उम्रकैद की सजा देने की बात मान ली और .. गुरु को भी बिना फासी जिन्दा रखा जायेगा ..... ताकी....... अगले भारत-पाक क्रिकेट के मैच के वक्त कसाब, गुरु की सदभावना के तौर पर 'मानवीय आधार पर' रिहाई की जा सके. ......पंत प्रधान मनमोहन जी ने इस ने इस निर्णय में अंदुरुनी तौर पर भाजपा से बातचीत भी की है और भविष्य में ऐसे मौके पर कसाब का ध्यान रखने की हामी भी ली है.कंदहर कांग्रेस ने इस समझोते से शरद पवार को जानबूझकर दूर रखा है . पवार कभी भी पलटी मार सकते इसका भारत-पाक-दाउद इन तीनो को शक नही यकीन है. बाकी....... अगले मेल से......
http://thanthanpal.blogspot.com/2011/03/blog-post_28.html#more

Apurva said...

पाकिस्तानने सोडलेला भारतीय कैदी एवीतेवी येत्या वर्षाअखेरीस २७ वर्षांची कैद संपवून मुक्त होणारच होता...

धनंजय गोखले said...

अहो करोडोच्या खेळाचा जो बाजार चालला आहे तेथे असल्या नितीमत्तेची आशा ठेवणे अतिशय व्यर्थ आहे.
हे सगळे बाजारात बसलेले दलाल पूर्ण देश विकायला बसले आहेत. हमाम मे सब नंगे अशी ह्यांची अवस्था
आहे.
एका लीबियाचे निम्मित करून अमेरिका आणि इंग्लंड तिथे घुसले. आधी असाच कांगावा करून इराक़ मध्ये
शिरले.
मग आपणच असे हतवीर्य का होतो अजून काळात नाही. अहिंसेचे गोडवे गौण राज्य करता येत नाही.
युद्धात होतो त्यापेक्ष्य जास्त खर्च आपला जम्मू आणि काश्मीर मध्ये होतो आहे.