February 18, 2007

बरळणे, बकणे, वगैरे वगैरे...

राम राम मंडळी,

हा लेख फक्त मनोगत या संकेतस्थळावरील सभासदांकरताच आहे. इतरांनी कृपया हे लेखन वाचू नये, कारण त्यांना या लेखाचा संदर्भ लागणार नाही. त्यातूनही त्यांनी वाचल्यास माझी काहीच हरकत असू शकत नाही. बापड्या तात्या अभ्यंकराचा ब्लॊग बाचून फुकटची कुणाची करमणूक झाली तर बरंच आहे की! ;)

तर बरं का मंडळी, आमच्या मनोगत या संकेतस्थळावर एक प्राणी आहे. नांवात काय आहे म्हणा? पण या लेखाच्या सोयीकरता आपण त्याला "माधव" म्हणू! सुरवातीला त्याचं आणि माझं तसं बरं होतं. पण हल्ली मात्र माधव माझ्यावर विशेष मेहेरबान आहे!

नुकताच माझे मनोगती मित्र संजोप राव यांनी त्यांच्या चावडीवर "पहिला दिवस -१" हा लेख प्रसिद्ध केला. तो आपल्याला इथे पाहता येईल. --

http://sanjopraav.wordpress.com/2007/02/

या लेखाला मी माझ्या पद्धतीने एक प्रतिसाद टाकला. आता बघा हां मंडळी कशी गंमत आहे ती. लेख लिहिला संजोप रावांनी, तो सुद्धा त्यांच्या चावडीवर. त्याला मी प्रतिसाद पाठवला त्यांच्याच चावडीवर, आता या सगळ्यात माधवचा संबंध कुठे आला? कुठेच नाही! बरं, संजोप राव यांच्या लेखाला जो मी प्रतिसाद दिला आहे, त्यातही मी कुठे माधवाचा उल्लेख केला नाही! माझा प्रतिसाद मनोगत या संकेतस्थळाच्या प्रशासना आणि मालकाच्या संदर्भात होता.

पण मंडळी, असंबद्ध बडबड माधव नाही करणार तर दुसरं कोण करणार?? ;) माझ्या प्रतिसादाचा माधवाच्या मठ्ठ विचारसरणीवर व्हायचा तो परिणाम झालाच! हे सगळं वाचून माधवाचा तोल सुटला आणि तो काहीबाही बरळू लागला!

त्या बरळण्यात म्हणे त्यांने एका विशिष्ठ मनोवृतीचा धिक्कार वगैरे केला आहे. बरं, "व्यक्तिचा नव्हे तर मनोवृतीचा धिकार करतो" अश्या साळसूदपणाचा एवढा आवच आणायचा होता, तर माझं नांव घेऊन, मला नतद्रष्ट वगैरे विशेषणं तरी लावायची नाहीत! अरे माधवा, तू मनोवृत्तीचा निषेध करतो आहेस ना? मग माझं नांव कशाला घेतोस? पण ही विसंगती तुझ्या लक्षात आली असती तर मी तुला मठ्ठ डोक्याचा कशाला म्हटलं असतं?? ;)

माधवाच्या या बरळण्याचा जरा इथे खरपूस समाचार घ्यावा ह्या हेतूनेच हा लेख लिहीत आहे, आणि म्हणूनच ही प्रस्तावना! माधवाच्या बरळण्यातला भाग लाल अक्षरात, माझ्या समाचाराचा भाग हिरव्या!

तैय्यार तर मग मंडळी? ;)

काही व्यक्ती जेथे जातात तेथे वादंग निर्माण करतात...हे स्पष्टपणे सांगायचे झाल्यास तात्या राव अभ्यंकर चे उदाहरण देता येईल.

असं का? बरं बरं!! ;)

सन्जोप रावांच्या इतक्या सुरेख लेखनाचा त्याने अक्षरश: चुथडा केला !!!

म्हणजे नक्की काय केलं रे? आणि संजोपच्या लेखातलं प्रमूख पात्र मीच तर आहे! माझ्याच स्वप्नातल्या "मनोगत भांडणकला महाविद्यालया" वर आधारित तर हा लेख आहे! कधी काळी हे सदर मीच मनोगतावर टाकलं होतं!! ;) म्हणून तर राव साहेबांसारख्या लोकांच्या प्रतिभेला घुमारे फुटले आणि त्यावर "पहिला दिवस-१" ही लेखमाला राव साहेबांनी सुरू केली! काय रावशेठ, खरं की नाही? ;)

पाचकळ व पांचट प्रतिसाद टाकून एखाद्या चांगल्या कलाकृतीचे सौंदर्य नष्ट करायचे हा त्याचा उद्योग बऱ्याच जणांच्या लक्षात आलेला आहे.

म्हणजे कुणाकुणाच्या रे? अरे निदान दोन-चार नांवं तरी घे की! ;)

त्यावरही पुढे जावून आपल्या मित्रमंडळींपैकी एखाद्याला / एखादीला आपल्या प्रतिसादाच्या बरोब्बर विरुद्ध प्रतिसाद टाकावयास लावणे हा तर अक्षरशः हलकट पणाचा कळस झाला......

कोण रे माझी मित्रमंडळी? कोणी माझ्याविरुद्ध प्रतिसाद टाकला आहे? अरे माधवा, असं असंबद्ध बरळण्याची तुझी सवय केव्हा जाणार रे?? ;) आणि हलकतपणाचा कळस?? अरे लेका मी तर हलकटपणाला अजून सुरवातदेखील केलेली नाहीये! ;) कळस बघशील तर फीट येऊन पडशीलंच! :D

फक्त मीच काय तो हुशार व सर्वांनी मलाच डोळ्यातले काजळ बनवून बसावे....किंवा मीच बोलणार बाकीच्यांनी फक्त ऐकण्याचे काम करावे ह्या प्रवृत्तीला माझा सुरूवाती पासून विरोध होता, आहे व ह्यापुढेही असणार आहेच.

हो का? छान छान! कर कर, तू फक्त विरोधच कर! तुला कोणी विचारो, वा न विचारो! आपण पण साला सामील आहे तुझ्या या विरोधयात्रेत! ;)

परंतु मनोगतावरील शुद्ध व पवित्र वातावरणाचा बट्ट्याबोळ करण्यास ह्या व अशाच प्रवृत्ती कारणीभुत आहेत.

उगी उगी! उगाच शुद्ध आणि पवित्र वातावरणाच्या नांवाखाली जास्त Excite होऊन फुकाचे गळे नको काढूस! ;) काय पण म्हणे, शुद्ध आणि पवित्र वातावरण! माऽऽऽऽऽऽऽय फूट!

तात्या अभ्यंकर सारख्या नतद्रष्ट माणसांचा विरोध करणे हा ह्या पत्रामागचा मुळ हेतू नाही, हे खास येथे नमुद करावे लागत आहे.

शाब्बास रे माझ्या माधवा! आता कुठे तू बरं लिहू लागला आहेस! मला "नतद्रष्ट" ही पदवी बहाल केल्याबद्दल तुला सौ सौ धन्यवाद! ;)

आपण संघटीत होऊन व्यक्ती विरोधात नव्हे तर प्रवृत्ती विरोधात आपले स्पष्ट मत मांडणे आवश्यक झाले आहे.

व्हा व्हा! संघटीत व्हा! या संघटनेचा म्होरक्या तू काय रे माधवा? ;)
कळू तरी देत तुझ्या संघटनेत आणखी कोण कोण मंडळी आहेत ते तरी!! की ही संघटना म्हणजे तुझी एक फॅन्टसी तर नव्हे ना? नाही, दिवसाउजेडी तुला स्वप्न पहायची सवय आहे म्हणून विचारतो!


ह्या मागचे उद्दीष्ठ म्हणजे बहुसंख्य वर्ग आपण वादाला कारणीभुत होऊ नये म्हणून किंवा वादात ओढले/फरफटले जावू नये म्हणून असल्या प्रवृत्तींपासून अंतर ठेवणे जास्त पसंत करतो.

हे कबूल!

ओघाओघाने चांगल्या लेखनाला प्रोत्साहनात्मक प्रतिसाद मिळत नाही व जेणेकरून निर्माता कंटाळून लेखन कमी करून टाकतो ह्यानेच, ह्या प्रवृत्तींचे इप्सीत साध्य होते.

धन्य आहे तुझी माधवा! हा शोध तुला केव्हा, कुठे व कसा लागला हे सांगशील? प्रोत्साहनात्मक प्रतिसाद मिळाले नाहीत म्हणून सर्जनशील व्यक्ति आपली अभिव्यक्ती थांबवत नाहीत! नव्हे, ती त्यांनी थांबवूही नये! आणि प्रोत्साहनत्मक प्रतिसाद द्यायचे, की निराशाजनक प्रतिसाद द्यायचे, की प्रतिसाद द्यायचेच नाहीत, हा निर्णय शेवटी मायबाप वाचकांचा! हो की नाही रे माधवा? ;)

कितीही म्हटले की वाचक/रसीक सुज्ञ आहेत तरी कावे व बारकावे लगेच लक्षांत न येता जनमताबरोबर सर्वसामान्य वाहवले जातात.

अरेच्च्या! कमालच करतोस! तू आहेस ना सर्वसामान्यांची होडी नीट वल्ल्हवून तिला मार्गस्थ करायला! इतक्यात हिम्मत हरलास? ;)
काय पण म्हणे, सूज्ञ काय, कावे-बारकावे काय, जनमत काय, सर्वसामान्य वाहवले जातात काय? अरे माधवा, झेपेल एवढंच बोलावं रे!

आपण सर्वांचा वावर मनोगतावर सदोदीत असतो व तो सुखकारक व तसाच कायम ठेवायचा झाल्यास असल्या प्रवृत्तींविरूद्ध आवाज नाही उठवता आला तरी त्यांना खतपाणी घालू नये म्हणजेच तो सदोदीत तसाच राहील हे माझे आपणा सर्वांस कळकळीचे आव्हान आहे.

अरे हो हो माधवा! जरा थांब की लेका. अरे मी संजोप रावांच्या चावडीवर माझा प्रतिसाद लिहिलाय रे! आणि तू मनोगताच्या नांवाने उगाच का ऊर बडवतो आहेस? अरे तात्या अभ्यंकर काय आहे, कसा आहे, हे मनोगतींना चांगलं माहित्ये रे माधवा! तू कशाला उगाच काळजी करतोस? तुला काय वाटलं, तात्या अभ्यंकर कसा आहे, काय आहे हे तू सांगितलंस तरच मनोगतींना कळेल? की तूच काय तो एकटा शहाणा आणि बाकी सगळे चुत्ये अशी तुझी समजूत आहे?


हां, संजोप रावांच्या चावडीवरील लोकांचा वावर सुखकर व्हावा असं म्हणत असशील तर गोष्ट वेगळी! :D

असल्या प्रवृत्तींविरूद्ध आवाज नाही उठवता आला तरी त्यांना खतपाणी घालू नये म्हणजेच तो सदोदीत तसाच राहील हे माझे आपणा सर्वांस कळकळीचे आव्हान आहे.

आवाऽऽऽऽऽऽऽज कुणाचा?? माधवाचा!!! अरे तुझ्या त्या संघटनेचं काय झालं रे? अरे थोड्यावेळापूर्वी तर आवाज उठवण्याच्या बाता मारत होतास. आणि आता इतक्यात "आवाज उठवण्याऐवजी खतपाणी घालण्याचं" शेपूट घातलंस! धत तुझी!! ;)

मी माझ्या काही मित्रांना हा लेख वाचण्याची विनंती केली ही माझी चूक तर नाही ना ह्याचा (इतपत) विचार करावा लागत आहे; ह्यावरून माझ्या सध्याच्या मन:स्थितीची कल्पना आपणांस येऊ शकेल.......

उगी उगी! शांत हो.. तुझी एकंदरीतच मनस्थिती सध्या ठीक नाहीये हे आम्हाला माहीत आहे! काळजी घे बाबा! आणि लवकर बरा हो!

तुझा,

तात्या.

4 comments:

राजीव अनंत भिडे said...

आयला तात्या, सहीच करून टाकली आहेस! पार डोक्यावरचं छप्परच उतरवून टाकलं आहेस.

लेख आवडला. तुझ्या धडाकेदार शैलीतले तडकफडक विचार वाचायला नेहमीच मजा येते. मानभावीपणाची किंवा व्हाईट कॊलर लेखनाची कुठेही झूल पांघरलेली दिसत नाही. शिवाय भाषेला खास रत्नागिरी-देवगडचे कोकणी वळण! त्यामुळे मी तुझे लेख नेहमीच आवडीने वाचतो.

हा माधव आपल्या बरोबर पिरंगुटला होता, तोच ना?

शिंत्रेगुरुजींचा पुढचा भाग कधी लिहिणार?

राजीव भिडे.

Milind said...

तात्या,

काही लोकांनी "गप्प राहण्याची कला" शिकायला हवी. नेमके तेच लोक "संवाद साधण्याच्या कला" वगैरे लिहितात.

मनोगतावर नवीन आलेल्या स्त्री सदस्यांना स्वागताचे अनाहूत व्यनि पाठवणे हे कुठल्या संवाद साधण्याच्या कलेत येते हे कळले नाही.

- सर्किट

तात्या अभ्यंकर. said...

सर्कीट,

>>मनोगतावर नवीन आलेल्या स्त्री सदस्यांना >>स्वागताचे अनाहूत व्यनि पाठवणे हे कुठल्या >>संवाद साधण्याच्या कलेत येते हे कळले नाही.

सही बोला भिडू...;)

तात्या.

Anonymous said...

Tatya, tya maadhavala aadhi server and telecommunication madhala to lekh (?) kadhi dakhvatos vichar. manogati ajun visarale nahi aahet tyacha to drama.. tyacha khotarade pana tithech ughada zala hota... tu kay ko tension leta hai?