February 18, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२१) - मन रे तू काहे ना..


मन रे तू काहे ना.. (येथे ऐका)

ईश्वराची रुपं जशी अनंत, तसंच यमनचंही आहे.. कोणत्याही शब्दांना, कोणत्याही लयीला यमनचा साज चढवा, एक अजरामर गाणं जन्माला येतं!

मन रे तू काहे ना धीर धरे
ओ निर्मोही मोह ना जानें
जिनका मोह करे..

संगीतकार रोशन. रफीसाहेबांचा स्वर. छान संथ लय, राग यमन..

स्वत:शीच एक तात्विक संवाद चालला आहे. अगदी निवांत! ज्याला 'सुलझा हुआ' म्हणता येईल असं एक मनोगत..म्हटलं तर एक आर्जव, एक प्रेमाचा सल्ला..

रफीसाहेबांची अगदी आतुन आलेली, अतिशय भावूक गायकी, तेवढीच कसदार..विलक्षण सुरेल! गोड गळा लाभलेला एक मोठा कलाकार. माणूस म्हणूनही तितकाच मोठा! या गाण्याकरता त्या देवाघरच्या माणसाला लाख सलाम...!

रफीसाहेबांवरील श्रद्धांजलीच्या एका कार्यक्रमात दिदिनेही या गाण्याच्या चार ओळी गुणगुणल्या आहेत.. अगदी सुंदर!

-- तात्या अभ्यंकर.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

तात्या,

आपल्याला एक विनंती करायची होती. जयजयवंती रागातले , सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले व लतानी गायलेल्या मालतीमाधव चित्रपटातल्या" बांध प्रीती फुलडोर मन लेके चितचोर " या गाण्यावर लिहाल काय.

तात्या अभ्यंकर. said...

ok sir, nakki praytna karen..
--tatyaa.